आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताची प्रमुख डिजिटल पेमेंट आणि आर्थिक सेवा देणारी कंपनी पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पेटीएम टी-२० क्रिकेट मालिकेदरम्यान यूपीआय मनी ट्रान्सफरवर पुन्हा आकर्षक ‘४ ची १०० कॅशबॅक ऑफर’ देण्याची घोषणा केली आहे. ही मालिका ९ जून ते १९ जून २०२२ पर्यंत खेळवली जाईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारत-वेस्ट इंडीज मालिकेदरम्यान पहिल्यांदा ही ऑफर देण्यात आली होती. यूपीआय ऑनलाइन मनी ट्रान्सफरसाठी पेटीएम ही कोट्यवधी ग्राहकांची पहिली पसंत आहे. सामन्याच्या दिवशी युजर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. यासाठी पेटीएम यूपीआयचा वापर करत ४ रुपये पाठवल्यास त्यांना १०० रुपयांची सुरक्षित कॅशबॅक मिळेल. नवे युजर गुगल प्लेस्टोअरमधून किंवा अॅप स्टोअरमधून पेटीएम डाउनलोड करून पेटीएम युपीआयसाठी साइनअप करू शकतात. पेटीएम युपीआय सेवांचा वापर करून युजर काही मिनिटांतच आपले बँक खाते लिंक करू शकतात. यात त्यांना थेट आपल्या बँक खात्यातून ऑनलाइन पेमेंट करणे सोपे जाते. तसेच ते लिंक्ड खात्यावरील बॅलन्सही नि:शुल्क तपासू शकतात. कोणताही युपीआय क्यूआर कोड स्कॅन करून ट्रान्झअॅक्शन करू शकतात. याशिवाय सध्याच्या युजर रेफरल प्रोग्रामच्या माध्यमातून १०० रुपयांपर्यंची कॅशबॅक जिंकू शकतात. यासाठी त्यांना आपले मित्र आणि कुटुंबियांना युपीआय मनी ट्रान्सफरसाठी पेटीएमचा वापर करण्यासाठी आमंत्रित करावे लागेल. पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले, “पेटीएम युपीआयद्वारे युजरला सुपरफास्ट आणि सुरक्षित मनी ट्रान्सफरची सुविधा मिळते. आम्ही जास्तीत जास्त लोकांना डिजिटल पेमेंट्सचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आगामी टी२० मालिकेदरम्यान अभियान राबवत आहोत.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.