आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात मोठा फिनटेक करार रद्द:पेयूने 38,500 कोटी रुपयांच्या बिलडेस्क अधिग्रहण करारातून घेतली माघार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर पेयूचा अधिकार असणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म प्रॉसस एनव्हीने भारतीय पेमेंट प्लॅटफॉर्म बिलडेस्कच्या संपादनातून माघार घेतली. याबरोबरच ३८,५०० कोटी रुपयांचा हा करार रद्द झाला. हा करार देशाच्या फिनटेक क्षेत्रातला सर्वात मोठा करार होता. प्रॉसस एनव्हीने ३१ ऑगस्ट, २०२१च्या बिलडेस्कच्या संपादनाची घोषणा केली होती. भारतीय फिनटेक क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी प्रॉसस कॅश देऊन बिलडेस्कचे अधिग्रहण होणार होते. परंतु कराराशी संबंधित काही पूर्वअटींची पूर्तता न केल्यामुळे करार रद्द झाला. प्रॉससने सोमवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

होता होता राहिली सर्वात मोठी पेमेंट कंपनी : पेयू-बिलडेस्क करार पूर्ण झाला असता तर देशाची सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी ठरली असती. याचे एकूण वार्षिक देयक मूल्य (टीपीव्ही) १२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असते. याच्या तुलनेत रेझरपे आणि सीसीएअॅव्हेन्यू यांचे टीपीव्ही अनुक्रमे ४ लाख कोटी आणि १.६ लाख कोटी. बिलडेस्कची स्थापना २००० मध्ये एमएन श्रीनिवासू, अजय कौशल आणि कार्तिक गणपती यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...