आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयने म्‍हटलेे की:कर्ज फेडताना लागलेला दंड मुद्दलामध्ये जोडला जाणार नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्ज फेडताना चूक केल्यामुळे लावण्यात आलेले दंडात्मक शुल्क मुद्दल रकमेत बँका आता जोडू शकणार नाहीत. बँकांना हे शुल्क आता स्वतंत्रपणे वसूल करावे लागेल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी बँकांसाठी परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे कर्ज फेडताना दंड लागल्यास कर्जधारकांना लावण्यात येणारे अतिरिक्त व्याज रोखण्यास मदत मिळेल. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, या शुल्काचे प्रमाण डिफॉल्ट/कर्ज करारातील नियम-अटींच्या एका मर्यादेपर्यंत पालन न केल्याच्या प्रमाणात असले पाहिजे. दंडात्मक शुल्क, करारबद्ध व्याजदराच्या अतिरिक्त कमाई करण्याचे साधन नाही.