आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Pension Assets Up 20% To Rs 8 Lakh Crore, 31% Growth In Corporate Sector Depositors Till September 24

निवृत्तीची काळजी:पेन्शन मालमत्ता 20 %ने वाढून आठ लाख कोटींवर,24 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांच्या संख्येत 31% वाढ झाली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली |आता लोक स्वत:च पेन्शनची सोय करू लागले आहेत. पेन्शन नियामक पीएफआरडीएच्या आकड्यावरून ही माहिती समोर आली. २४ सप्टेंबरपर्यंत नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजना (एपीवाय) अंतर्गत अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम)ची रक्कम वाढून ८ लाख कोटी रुपयांच्या जवसळ पोहोचली आहे. यात वार्षिक आधारावर १९.७६% वाढ झाली. पीएफआरडीएच्या मते, गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेन्शन योजनेचे एयूएम ७.९९ लाख कोटी रुपयाच्या पातळीवर पोहोचले आहे. ते मार्च २०२२ च्या शेवटपर्यंतच्या ७.३७ लाख कोटी रुपयापेक्षा ८.४% जास्त. त्यादरम्यान कॉर्पोरेट सेक्टरच्या सदस्यांच्या संख्येत ३१% आणि सर्वच प्रकारच्या सदस्यांच्या संख्येत ३२% वाढ झाली.

म्हणून एनपीएस लोकप्रिय सुरक्षित गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक परतावा एनपीएस 8-10% पीपीएफ 7.1% पीओ स्कीम्स 5.5-6.70% बँक एफडी 5-5.90% (पीओ-पोस्ट ऑफिस) बँक एफडीचे दर वाढू लागले आहेत, परंतु परतावा अजूनही कमी आहे.

पेन्शन योजनेत वाढ पीएफआरडीए चेअरपर्सन सुप्रीतम बंदोपाध्यायने यावर्षी मार्चमध्ये सांगितले होते की, वाढती महागाई आणि व्याजदरात संभाव्य वाढीसारखी आव्हाने असूनही २०२२-२३ मध्ये पेन्शन योजनेचे एयूएम २८-३०% वाढेल. ते २०२१-२२ मध्ये २७.५%च्या वाढीपेक्षा जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात पेन्शन योजनांची एयूएम ७.५ लाख कोटींच्या उद्दिष्टापेक्षा थोडी कमी होती.

पीएफआरडीए चेअरपर्सन सुप्रीतम बंदोपाध्यायने यावर्षी मार्चमध्ये सांगितले होते की, वाढती महागाई आणि व्याजदरात संभाव्य वाढीसारखी आव्हाने असूनही २०२२-२३ मध्ये पेन्शन योजनेचे एयूएम २८-३०% वाढेल. ते २०२१-२२ मध्ये २७.५%च्या वाढीपेक्षा जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात पेन्शन योजनांची एयूएम ७.५ लाख कोटींच्या उद्दिष्टापेक्षा थोडी कमी होती.

वाढत्या अनिश्चिततेमुळे पेन्शन उत्पादनांची मागणी वाढली पीएफआरडीए अधिकाऱ्यांच्या मते, वाढते व्याजदर आणि भू-राजकीय चिंतांमुळे देशातील पेन्शन उत्पादनांची मागणी वाढली आहे. परंतु नवीनतम एयूएमचे ताजी आकडेवारी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील पीएफआरडीए अंदाजानुसार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अपेक्षा करत होतो की एनपीएस आणि एपीवायचे एयूएम सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस ८ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल.’

बातम्या आणखी आहेत...