आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Business
 • Permission To Open IT Sector With 50 Percent Employees If Banks, Capital And Debt Markets Remain Open

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योगांसाठी दिशा-निर्देश:बँक, कॅपिटल आणि डेट मार्केट खुले राहतील; आयटी सेक्टरला 50% कर्मचाऱ्यांसह कार्यालये उघडण्याची परवानगी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ई-कॉमर्स कंपन्यांसह या कंपन्या आणि उद्योगांसह स्वयं रोजगार करणाऱ्यांना काम सुरू करण्याची परवानगी

केंद्र सरकारने बुधवारी लॉकडाउनच्या नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार 20 एप्रिलपासून सशर्त सूट लागू केली जाईल. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे नियम कोटकोरपणे पाळावे लागतील. यात स्वयं रोजगार करणाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा जसे की, इलेक्ट्रिशियन, आयटी रिपेअर्स, प्लंबर्स, मोटार मेकॅनिक्स आणि कारपेंटर्स यांना परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागांमध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेर खाद्य सामुग्री अर्थात फूड प्रोसेसिंग उद्योगांना सुद्धा आपले कामकाज सुरू करता येईल. ज्या ठिकाणी सतत प्रोसेस सुरू ठेवण्याची गरज असते अशा प्रॉडक्शन हाउस आणि कारखान्यांमध्ये सुद्धा काम सुरू केले जाऊ शकते.

फायनांशियल सेक्टर

 • आरबीआय आणि आरबीआयकडून रेगुलेटेड फायनांशियल मार्केट आणि एनपीसीआय, सीसीआयएल सारख्या कंपन्या आणि पेमेंट सिस्टिम ऑपरेटर काम करत राहतील.
 • बँकांच्या शाखा आणि एटीएम, बँकिंग कामकाजासाठी असलेले आयटी वेंडर, बँकिंग कॉरेसपाँडेंट, एटीएम ऑपरेशन आणि कॅश व्यवस्थापन करणाऱ्या संमस्था.
 • डीबीटी कॅश ट्रांसफर होईपर्यंत बँकिंग शाखांना सामान्य कामकाजाच्या तासांप्रमाणे काम करण्याची परवानगी राहील.
 • स्थानिक प्रशासन बँक शाखांमध्ये आवश्यक सिक्यॉरिटी पुरवठा करणार आहे. बँकिंग कॉरेसपाँडेंट सोशल डिस्टन्सिंग आणि कायद्याचे पालन करतील.
 • सेबीच्या नोटिफिकेशननुसार, सेबी, कॅपिटल आणि डेट मार्केट (कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था) खुल्या राहतील.
 • आयआरडीआय आणि विमा कंपन्या

या कमर्शियल आणि खासगी आस्थापना खुल्या राहतील

 • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासोबतच ब्रॉडकॉस्टिंग, डीटीएच आणि केबल टीव्ही सेवाशी निगडीत उपक्रम सुरू राहतील.
 • माहिती प्रसारण आणि त्या संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या, आस्थापनांना 50 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
 • केवळ सरकारी कामकाजासाठी संबंधित डेटा आणि कॉल सेंटर्स ज्या ठिकाणी उघडल्या जातील त्याच ठिकाणी सरकारकडून मान्यता प्राप्त असलेल्या सामान्य सेवा केंद्र अर्थात कॉमन सर्विस सेंटर ग्राम पंचायत पातळीवर उघडले जातील.
 • ई-कॉमर्स कंपन्या, त्यांच्याकडून वापरले जाणारे वाहन, आवश्यक परवानगीसह ऑपरपेट करण्यास मंजुरी देण्यात आली.
 • कुरिअर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाउसिंग सेवा, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, कंटेनर डेपो, इंडिव्हिजुअल युनिट आणि त्याच्याशी संबंधित इतर लॉजिस्टिक सेवांची साखळी सुद्धा सुरू करण्यात आली.

हॉटेल, होम स्टे, लॉज आणि मॉटेल्सला परवानगी

 • खासगी सुरक्षा देणाऱ्या सेवा आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट सेवांचे कार्यालय, रहिवासी काँप्लेक्सची डागडुजी इत्यादींना मंजुरी.
 • असे हॉटेल्स, होम स्टे, लॉज आणि मॉटेल्सला सुद्धा परवानगी देण्यात आली ज्या ठिकाणी लॉकडाउनमुळे पर्यटक अडकले आहेत.
 • मेडिकल आणि आपातकालीन स्टाफ, एअर आणि सी क्रू यांना मंजुरी.
 • क्वारंटाइन फॅसिलिटीसाठी एस्टॅबलिशमेंटचा वापर करण्यास परवानगी.
 • स्वयं रोजगार करणाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा जसे की इलेक्ट्रिशियन, आयटी रिपेअर्स, प्लंबर्स, मोटार मेकॅनिक्स आणि कारपेंटर यांना काम सुरू करण्याची परवानगी.

उद्योग आणि औद्योगिक आस्थापना

 • असे उद्योग धंदे जे ग्रामीण भागांमध्ये केले जातात. महानगर पालिका आणि नगरपालिका हद्दीच्या बाहेर ते सुरू केले जाऊ शकतात.
 • सेझ आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्समध्ये नियंत्रित केल्या जाणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर औद्योगिक उपक्रम, इंडस्ट्रियल एस्टेट आणि इंडस्ट्रियल टाउनशिपला आपल्या कर्मचाऱ्यांना त्याच परिसर किंवा जवळपास राहण्याची व्यवस्था करण्यासोबत स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलची अंमलबजावणी करावी लागेल. कंपनीकडून केल्या जाणाऱ्या ट्रांस्पोर्ट आणि सोशल डिस्टेन्सिंगचे पालन केल्यास त्यांना काम करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.
 • आवश्य साहित्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, औषधी, मेडिकल डिव्हाइस आणि त्यांच्या कच्च्या सामुग्रीसह इंटरमीडिएट अर्थात मध्यस्थांना काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
 • ग्रामीण भागात परंतु महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीबाहेर खाद्य संस्करण उद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
 • असे प्रॉडक्शन हाउस सुरू केले जाऊ शकातत ज्या ठिकाणी सतत प्रोसेस सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यांना सप्लाय चेन सुद्धा सुरू करता येऊ शकेल.
 • आयटी हार्डवेअर मॅन्यूफैक्चरिंग, कोळसा उत्पादन, उत्खनन आणि खनिज उत्पादन आणि उत्खनन संचालनाला आणि त्यांच्या पुरवठा साखळी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 • पॅकेजिंग मटेरिअलची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आपले कामकाज सुरू करू शकतात. जूट इंडस्ट्रीज वेग-वेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतात. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.
 • ऑइल आणि गॅस एक्सप्लोरेशन आणि तेल शुद्धीकरण, ग्रामीण भागांत वीट भट्टीचे काम सुरू केले जाऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...