आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Petrol Diesel Became Expensive Again Today, This Month In Just 20 Days, Petrol Became Costlier By Rs 4.55 And Diesel By Rs 5.05

महागाई:आज पुन्हा महागले पेट्रोल-डिझेल, या महिन्यात केवळ 20 दिवसांमध्येच पेट्रोल  4.55 आणि डिझेल 5.05 रुपयांनी महागले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 दिवसांमध्ये 15 व्यांदा वाढल्या किंमती

सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 35-35 पैसे वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 106.19 रुपयांवर पोहोचली आहे आणि डिझेलची किंमत 94.92 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.

देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहरपेट्रोल (रुपए/लीटर)डीजल (रुपए/लीटर)
श्रीगंगानगर118.32109.12
अनूपपुर117.63106.76
परभणी114.64103.75
भोपाल114.81104.15
जयपूर113.38104.58
मुंबई112.11102.89
दिल्ली106.1994.92

20 दिवसांमध्ये 15 व्यांदा वाढल्या किंमती
या महिन्यात केवळ 20 दिवसात पेट्रोल-डीझेल 15 वेळा महाग झाले आहे. यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 4.55 आणि डिझेल 5.05 रुपये महाग झाले आहे. तर 2021 विषयी बोलायचे झाले तर यावर्षी 1 जानेवारीला पेट्रोल 83.97 आणि डिझेल 74.12 रुपये प्रति लीटर होते. आता हे 106.19 आणि 94.92 रुपये प्रति लीटरवर आहे. म्हणजेच 10 महिन्यापेक्षाही कमी वेळेत पेट्रोल 22.22 आणि डिझेल 20.80 रुपयांपर्यंत महाग झाले आहे.

84 डॉलरच्या पार कच्चे तेल
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चे तेल 85 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले आहे. यापूर्वी 2018 मध्ये कच्चे तेल 85 डॉलरवर पोहोचले होते. येत्या काळात कच्चे तेल 90 डॉलर पर्यंत जाऊ शकते असे तज्ञांचे मत आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल अधिक महाग होऊ शकते.

32 राज्यांमध्ये पेट्रोल आणि 16 राज्यांत डिझेल 100 च्या पुढे गेले देशातील 29 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरच्या पार गेले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दमण आणि दीव, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पुद्दुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा , मिझोराम, झारखंड, गोवा, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, मेघालय, दादरा आणि नगर हवेली आणि राजस्थानमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर आहे.

दुसरीकड डिझेलविषयी बोलायचे झाले तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, केरळ, कर्नाटक, गोवा, दादरा आणि नगर हवेली, तामिळनाडू आणि राजस्थान अशा अनेक ठिकाणी 100 रुपये प्रति लीटरच्या वर आहे.

पीएम मोदी ग्लोबल ऑइल आणि गॅस सेक्टरच्या सीईओशी संवाद साधतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधतील. त्यात तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक नेत्यांचा समावेश आहे, जे या क्षेत्रातील प्रमुख मुद्द्यांवर विचार करतात आणि भारताबरोबर सहकार्य आणि गुंतवणुकीच्या संभाव्य क्षेत्रांचा शोध घेतात. पीएमओच्या म्हणण्यानुसार, ही बैठक संध्याकाळी 6 वाजल्यापासून होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...