आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Petrol diesel Boom Hinders Economic Recovery, Fuel Twice As Expensive In India As In Pakistan

अर्थव्यवस्था:पेट्रोल-डिझेलवरील भरमसाठ कराने आर्थिक सुधारणेत अडसर, भारतात पाकपेक्षा दुप्पट महाग इंधन

नवी दिल्ली / देबजीत चक्रवर्ती/साकेत सुंदरिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील किमतीत घसरण, भारत अपवाद, आशियात सर्वात महाग डिझेल भारतात विकते

भारतीय अर्थव्यवस्थेत भलेही सुधारणेचे संकेत दिसत असले तरी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे यावर लगाम लागू शकतो. एवढेच नव्हे तर महागाईमध्येही वेगाने वाढ होऊ शकते. यामुळे मागणीत आणखी घट येऊ शकते. मेमध्ये पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर दहा रुपये वाढीने महागाईवर परिणाम झाला. एवढेच नव्हे तर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीतील सुधारणेमुळे पेट्रोल-डिझेलच्या गुंतवणुकीत आणखी वाढ झाली. यामुळे अचानक किमतीत वाढ झाली आहे. उद्योगांचा नफा खूप कमी झाला आहे. 

ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचे भारतातील अर्थतज्ञ अभिषेक गुप्ता म्हणाले, येत्या काही महिन्यांत चलनवाढ हाेण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. यासोबत औद्योगिक उत्पादनही कमकुवत आहे. ब्लूमबर्गनुसार, आधीपासूनच संकेत मिळत आहेत की, उच्च किमती मागणीवर विपरित परिणाम टाकत आहेत. जूनमधील विक्रीच्या आकडेवारीनुसार, असे लक्षात येते की, भारतात पेट्रोलियम उत्पादनांचा वापर एका वर्षाआधीच्या तुलनेत ८% कमी झाला आहे. दुसरीकडे, डिझेल व पेट्राेलचा वापर अनुक्रमे १५% आणि १४% घसरला आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे या वर्षी दोन वेळा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे दिल्लीत एप्रिल अखेरपासून डिझेलच्या किमतीत ३०%, तर पेट्रोलमध्ये १६% उसळी आली आहे.

डिझेलवर कर पाचपट, पेट्रोलवर दुप्पट वाढला

गेल्या नऊ वर्षांत डिझेलवरील करात पाचपट वाढ झाली आहे. पेट्रोलवर दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. राज्य सरकारेही पेट्रोल-डिझेलवर कर वसूल करतात. केवळ दिल्लीत हा किरकोळ किमतीच्या जवळपास एक चतुर्थांश आहे. याच कारणास्तव भारतात पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमती आशियात सर्वात जास्त आहेत.

तज्ञ म्हणाले, डिझेलवरील कर वृद्धी असामान्य आहे

ब्लूमबर्ग इंटेलिजन्सनुसार, या वर्षी इंधनाच्या वाढत्या किमतीने सरकारला महसुलात एका वर्षात जवळपास ३० अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. उद्योग सल्लागार एफजीईचे वरिष्ठ विश्लेषक सेंथिल कुमारन म्हणाले, जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण आली आहे. मात्र, भारत याला अपवाद आहे. येथे डिझेलवरील करात एवढी वृद्धी असामान्य आहे. जास्त किमती अर्थव्यवस्थेत आणखी एक अडचण निर्माण करत आहे. डिझेल असे इंधन आहे जे देशाच्या एकूण माल पुरवठ्यात दोन तृतीयांश वापरले जाते. हे निर्मिती व कृषी दोन्हींसाठी खूप आवश्यक आहे.

२५ रुपयांत तयार पेट्रोलवर लागतो ६० रुपयांपर्यंत कर

25 रुपये लीटर मध्ये तयार होणाऱ्या पेट्रोलवर सरकारे ६० रुपयांपर्यंत कर आकारून ते ८५ रुपये लिटरने वसूल करतात. याच पद्धतीने डिझेल २७ रुपये लिटरमध्ये तयार होते. यावरही ५०-५५ रु. प्रति लिटर कर लागतो.

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने यंदा नफा कमी

जोधपूरमधील वाहतूक कंपनीचे मालक दिलीप लांबा यांच्याकडे ५० ट्रक आहेत. जवळपास तीन चतुर्थांश ताफा मंदीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून बसून आहे. याच पद्धतीने हरियाणातील शेतकरी धरमपाल नम्बरदार गहू आणि मोहरीची शेती करतात. यंदा नफा होणार नाही, याची दोघांना चिंता आहे. त्यांना ही चिंता कोरोना महामारीमुळे नव्हे, तर इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने सतावते आहे. लांबा म्हणाले, डिझेल वाहतूक खर्चात ७० टक्क्यांची भूमिका बजावते. म्हणजे जेवढ्या डिझेलच्या किमती वाढतील तेवढे भाडे वाढेल. ग्राहक जास्त भाड्यासाठी तयार नाहीत.