आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Petrol Diesel, Petrol Reached Rs 101 In Madhya Pradesh And Rajasthan, Soon After Assembly Elections; News And Live Updates

निवडणुका संपताच दरवाढ:निवडणुका संपताच वाढले पेट्रोल-डीझेलचे दर, परभणीत पेट्रोल प्रति लिटर 99.34 तर मुंबईत 96.95 रुपये; राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुन्हा शंभरी पार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत अजूनही होऊ शकते वाढ

देशातील 5 राज्यातील निवडणुका संपताच पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी पेट्रोलमध्ये 15 पैशांनी तर डीझेलमध्ये 18 पैशांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात इंधनाच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही पडले असून राज्यात सर्वात महाग पेट्रोलची नोंद परभणीत झाली आहे. दरम्यान, परभणीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 99.34 तर मुंबईत 96.95 रुपये आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 90.55 रुपये तर डिझेल 80.91 रुपये प्रतिलिटरवर पोचले असून तब्बल 18 दिवसानंतर या दोन्ही इंधनाच्या किंमतीत बदल झाला आहे. यावर्षी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जानेवारीत 10 पट तर फेब्रुवारीमध्ये 16 पटीने वाढल्या होत्या. मार्च महिन्यात पेट्रोल-डीझेलचे दर 3 वेळा खाली आले असून एप्रिलमध्ये 1 वेळा यामध्ये बदल झाला होता. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 27 फेब्रुवारी रोजी वाढ करण्यात आली होती.

पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत अजूनही होऊ शकते वाढ
गेल्या दोन महिन्यांपासून देशातील 5 राज्यांत निवडणुक सुरु होत्या. दरम्यान, कच्चे तेल महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती. तथापि, कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर चार हप्त्यांमध्ये कमी करण्यात आले होते. परंतु, आता निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 61 डॉलर होती. जी मार्चमध्ये 64.73 डॉलरवर आली. सध्या कच्चा तेलाची किंमती 68 डॉलर असून यामध्ये येत्या काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 ते 3 रुपयांची वाढ होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...