आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी इंधन कंपन्यानी आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोल 94.12 आणि डिझेल 84.63 रुपये प्रति लिटरने विकल्या जात आहे. तिकडे, दिल्लीमध्ये पेट्रोल 87.60 तर डिझेल 77.73 रुपयांवर आले आहे. विशेष म्हणजे, राजस्थानच्या गंगानगरमध्ये साधे पेट्रोल 98.10 रुपये तर प्रीमियम पेट्रोल 102 रुपयांवर आले आहे. मिळालेल्या माहितनुसार, आजही पेट्रोल 38 आणि डीझेल 33 पैशांनी वाढू शकते.
या महिन्यात चार वेळेस वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती
फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चारवेळा वाढल्या आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये पेट्रोलची किंमत 2.59 रुपये आणि डीझेलची किंमत 2.61 रुपयांनी वाढली होती.
कच्चा तेलाच्या किमती वाढत आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या भावांवर पडत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव 60 डॉलर प्रती बॅरलपर्यंत गेला होता.
दररोज सकाळी 7 वाजता ठरतात पेट्रोल-डिझेलच्या किमती
ऑइल मार्केटिंग कंपन्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवतात. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करतात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS द्वारे माहिती करुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या कस्टमर RSP स्पेस पेट्रोल पंपाचा कोड लिहून 9224992249 नंबरवर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 नंबरवर पाठवून किमती माहित करुन घेऊ शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.