आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक राज्यांतील पेट्रोल-डिझेलची स्थिती:दिल्लीपेक्षा गुजरातमध्ये 6% कमी कर; तर हिमाचलमध्ये दोन्ही राज्यांपेक्षा जास्त महाग

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांसोबतच दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीचीही देशात जोरदार चर्चा आहे. या निवडणुकांच्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली.

अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र, तसे झालेच नाही. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबद्दल बोलायचे तर अन्य दोन राज्यांपेक्षा गुजरातमध्ये तेलाच्या किमती सर्वात कमी आहेत

टॅक्सनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर दुप्पट
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किमतीवर 19.90 रुपये उत्पादन शुल्क आकारत आहे. जे सद्या 57.16 रुपये आहे. यानंतर, राज्य सरकारे त्यावर व्हॅट आणि उपकर आकारतात, त्यानंतर त्यांची किंमत मूळ किंमतीपेक्षा दोन पट वाढते. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलमधून व्हॅट आणि सेस गोळा करण्यात दिल्ली आघाडीवर आहे. येथे पेट्रोलवर 19.40% आणि डिझेलवर 16.75% VAT आकारला जातो.

अंदमान-निकोबारमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल
देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे विकले जात आहे. येथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये आहे. त्याचवेळी, ते राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये सर्वात महाग विक्री होते. येथे पेट्रोल 113.48 रुपये तर डिझेल 98.24 रुपये दराने विक्री केले जाते.

राज्यातील विविध शहरांमध्ये दरात तफावत का?
पेट्रोल-डिझेल पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर ते पेट्रोल पंप ऑइल डेपोपासून किती अंतरावर आहे, त्यानुसार भाडे आकारले जाते. त्यामुळे शहर बदलण्याबरोबरच भाडेही वाढते किंवा कमी होते. त्यामुळे विविध शहरांमध्येही दरात तफावत आहे.

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कसे ठरवले जातात?
जून 2010 पर्यंत सरकारने पेट्रोलचे दर निश्चित केले होते आणि ते दर 15 दिवसांनी बदलले जात होते. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत सरकार डिझेलचे दर ठरवत असे.

19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.

निवडणुकीत पेट्रोल-डिझेलच्या दरांना ब्रेक लागतो
तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्याबाबत सरकार आपली भूमिका नाकारू शकते, परंतु निवडणुकीच्या काळात सरकार जनतेला खूश करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करत नाही, असे गेल्या अनेक वर्षांपासून दिसून आले आहे. निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे जनतेला दिलासा मिळाल्याचे गेल्या वर्षांतील कल सांगत आहेत.

तीनही निवडणूक राज्यांमध्ये सिलिंडरची स्थिती काय
जर आपण निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोललो. तर दिल्लीत त्याची किंमत 1053.50 रुपये असेल. जे शिमला आणि गांधीनगरपेक्षा किंचीतच स्वस्त आहे. शिमल्यात 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर 1098.58 रुपयांना विकला जात आहे. तर गांधीनगरमध्ये 1060.50 रुपयांना सिलिंडर विक्री केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...