आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंधन दरवाढ:10 दिवसांत डिझेल 5.80 रुपये आणि पेट्रोल 5.45 रुपयांनी महागले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीनंतरही डिझेल, पेट्रोलच्या किमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती कमी असूनही देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ सुरूच असल्याचे दिसून येते. मंग‌ळवारी पुन्हा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली.

मागील १० दिवसांमध्ये प्रतिलिटर पेट्रोल ५.४५ रुपये तर डिझेल ५.८० रुपयांनी महागले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर ७६.२६ रुपयांवरून ७६.७३ रुपये झाल्या आहेत. तसेच डिझेलचे दरदेखील ७४.६२ रुपयांवरून ७५.१९ रुपयांवर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत यात ५७ पैशांची वाढ झाली आहे. सध्या इंडियन बास्केट तेलाची किंमत घटून प्रतिबॅरल ३५ डॉलरच्या आसपास आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्या तरी ग्राहकांना त्या प्रमाणात दिलासा मिळत नाही.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय धक्कादायक: सोनिया

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही आणि कोरोनाच्या संकटात डिझेल-पेट्रोल दरवाढीचा सरकारचा निर्णय धक्कादायक असल्याचे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरणीनंतर सरकार नागरिकांना दिलासा देण्याएेवजी त्यांना संकटात टाकत असल्याचेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...