आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Petrol Diesel Price I Global Crude Oil Prices At 7 Month Low I Latest News And Update 

पेट्रोल-डिझेल 3 रुपयाने स्वस्त होणार:महागाईपासून मिळेल दिलासा; कच्च्या तेलाचे दर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य वाढत्या महागाईने त्रस्त झालेला आहे.
  • आता कच्च्या तेलाच्या किमती सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत.
  • आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड) किमती 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रतिलिटर 3 रुपयांनी कमी होऊ शकतात. याआधी फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 90 डॉलरच्या जवळ होता.

कच्चे तेल $125 ते 90 च्या जवळ

कच्च्या तेलाची घसरण सुरूच आहे. जूनमध्ये क्रूड 125 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले होते. सध्या ते प्रति बॅरल $92 वर व्यापार करत आहे. म्हणजेच, ते आतापर्यंत सुमारे 26% ने कमकुवत झाले आहे. युरोप, चीनमधील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आहे. इतर अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत क्रुडची मागणी पुढे कमजोर राहण्याची भीती आहे.

तेलाचे दर कमी होण्याची शक्यता

  • आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, क्रूड येत्या काही दिवसांत $85 पर्यंत खाली येऊ शकते. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दरही प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी कमी होऊ शकतात.
  • रेटिंग एजन्सीचे सह-समूह प्रमुख तथा उपाध्यक्ष प्रशांत वशिष्ठ यांनी सांगितले की, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 55-60 पैशांनी वाढतात. जेव्हा कच्चे तेल प्रति बॅरल 1 डॉलरने महाग होते. दुसरीकडे, कच्चे तेल 1 डॉलरने स्वस्त झाले. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 55-60 पैसे प्रति लिटर कमी होते.

22 मे पासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून आजतागायत पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात झाली नसून केवळ दर वाढले आहेत.

भारत 85% कच्च्या तेलाची आयात करतो
आम्ही आमच्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची खरेदी बाहेरून करतो. त्याची किंमत आम्हाला डॉलरमध्ये मोजावी लागेल. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने आणि डॉलरच्या मजबूतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ लागले आहे. कच्चे तेल बॅरलमध्ये येते. एक बॅरल म्हणजे १५९ लिटर कच्चे तेल.

पेट्रोल-डिझेलच्या किमती कशा ठरवल्या जातात?
जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे आणि दर 15 दिवसांनी त्यात बदल होत असे. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. तसेच ऑक्‍टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दरही सरकारने ठरवले होते, मात्र 19 ऑक्‍टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात

बातम्या आणखी आहेत...