आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दर:करकपात न केल्यास पेट्रोल-डिझेल महागणार;...यामुळे क्रूडमध्ये दरवाढ, डिसेंबरपर्यंत 90 डॉलर प्रति बॅरल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता. अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉलर प्रति बॅरल झाले. दोन्ही इंधनांत सलग पाचव्या दिवशी उसळी दिसली. केंद्र व राज्य सरकारांनी कर कपात केली नाही तर भारतात आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलचे ३ रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. एक महिन्याआधी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरल हाेते. म्हणजे, एका महिन्यात यात १४.३% ची वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीत हे प्रति बॅरल ५१ डॉलर होते. या हिशेबाने या वर्षी याच्या दरात ५६.९% ची वाढ झाली.

... यामुळे क्रूडमध्ये दरवाढ
- क्रूडच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा आणि उत्पादनात घट.
- आगामी हिवाळ्यात मागणी आणखी वाढण्याचा दबाव.
- पुरवठा कायम राहण्यासाठी पुरेशी गुंतवणूक केली जात नाही.
- ओपेक समूहाकडून उत्पादनावर अंकुश लावणे आणि जागतिक आर्थिक सुधारणेमुळे मागणीत वाढ

डिसेंबरपर्यंत 90 डॉलर प्रति बॅरल :
उत्पादनात वाढ न झाल्यास कच्च्या तेलाचे दर वाढतील. यंदा दर ९० डॉलर प्रतिबॅरलवर जाऊ शकतात. दुसरीकडे, ब्रिटिश पेट्रोलियम सिंगापूरचे अध्यक्ष यूजीन लेओंग म्हणाले, २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत जागतिक तेलाचा वापर कोरोनापूर्वीच्या पातळीवर येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...