आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता, अबकारी कर कपातीचा केंद्राचा विचार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालय या पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी करात कपात करण्याचा विचार करत आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘याप्रकरणी राज्य सरकारे, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी सल्लामसलत केली जात आहे. कराबाबत एखादा योग्य मार्ग निघावा, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. त्याला तेल कंपन्यांकडून सहमती मिळण्याची अपेक्षा आहे.’ गेल्या १० महिन्यांत कच्च्या तेलाचे दर दुप्पट झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. तथापि, देशात त्यांच्या किरकोळ दरांत कर किंवा अबकारी कर सुमारे ६०% पर्यंत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सरकारने एका वर्षात दोन वेळा पेट्रोल-डिझेलवर कर वाढवला आहे. विशेष म्हणजे केंद्र व राज्य सरकारांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत पेट्रोलियम उत्पादनांतून ४.२१ लाख कोटी रुपये कमावले आहेत.

गॅस पुन्हा महाग; ३ महिन्यांत २२५ रु. दरवाढ
सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. १४.२ किलोचे विनाअनुदानित सिलिंडर २५ रुपयांनी महाग होत ते ८१९ रुपयांवर गेले. गेल्या तीन महिन्यांत गॅसचे दर २२५ रुपयांनी वाढले आहेत. याआधी १ डिसेंबर २०२० ला गॅसचे दर ५० रुपयांनी वाढवले होते. नंतर १ जानेवारी २०२१ ला ५० रुपये, ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १५ फेब्रुवारीला ५० रुपये आणि २५ फेब्रुवारीला २५ रुपये वाढले होते. कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ९०.५० रुपयांनी वाढवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...