आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Petrol Price Hike ; Petrol And Diesel Prices Increased For The 14th Time In 16 Days | Marathi News

महागाईचा भडका:16 दिवसांत 14व्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, दरात 10 रुपयांची वाढ; आणखी वाढू शकतात भाव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात आज 16 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14व्यांदा वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. देशात 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 9.96 रुपयांनी वाढ झाली आहे.

मार्च 2022 मध्ये देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. दरवाढीवर युक्तिवाद करताना पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहरपेट्रोल (रुपए/लीटर)डिझेल (रुपए/लीटर)
परभणी123.47106.23
श्रीगंगानगर122.93105.34
अनूपपुर120.95103.75
भोपाळ118.14101.16
जयपुर118.03100.92
मुंबई120.51104.77
दिल्ली105.4196.67

भाव आणखी वाढू शकतो
क्रिसिल रिसर्चच्या अहवालानुसार, ऑइल मार्केंटिंग कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 15 ते 20 रुपयांनी वाढ करण्याची गरज होती. या दृष्टीकोनातून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी 10 रुपयांनी वाढ होऊ शकते.

CNGही महाग झाला
आजपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यासह दिल्लीत सीएनजीची किंमत 2.5 रुपयांनी वाढून 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याचवेळी दिल्लीतच नाही तर नोएडामध्येही सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि गाझियाबादमध्ये गेल्या ४८ तासांत सीएनजीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. नोएडा, गाझियाबादमध्ये ६६.६८ रुपये, तर गुरुग्राममध्ये ७२.४५ रुपये प्रतिकिलो आहे.

बातम्या आणखी आहेत...