आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Petrol Price Hiked By Rs 10.11 In 6 Months, Petrol By 18 Paise, Crude By 15% In 15 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल दर:6 महिन्यांत 10.11 रुपये वाढून पेट्रोल 18 पैसे स्वस्त, 15 दिवसांत क्रूड 15% स्वस्त, पेट्रोल मात्र 0.2 %च

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग २४ दिवसांपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर राहिल्यानंतर बुधवारी त्यात किरकोळ घट झाली. राष्ट्रीय राजधानीत पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी स्वस्त झाले. यापूर्वी २७ फेब्रुवारीला पेट्रोल व डिझेलची दरवाढ करण्यात आली होती. नव्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल ९०.९९ रुपये आणि डिझेल ८१.३० रुपये प्रतिलिटर झाले आहे. यापूर्वी शेवटची दरकपात २२ सप्टेंबर २०२० ला झाली होती. तेव्हा पेट्रोल ८ पैसे स्वस्त झाले होते. गेल्या ६ महिन्यांत पेट्रोलचे दर १०.११ रुपयांनी वाढवले. कपात मात्र केवळ १८ पैशांची झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल घसरले
कच्च्या तेलाच्या दरांत प्रचंड घसरण आहे. ब्रेंट क्रूडची किंमत ६.५२ % घसरून ६ आठवड्यांनंतर ६०.७३ डॉलर प्रतिबॅरल झाली. गेल्या १५ दिवसांत कच्च्या तेलाचे दर १५ %पेक्षा जास्त घटले. तथापि पेट्रोलच्या दरात ०.२ टक्क्यापेक्षाही कमी कपात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...