आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Petrol Pumps Dry In Many States; Government oil Companies Say, Don't Panic, Supply Is Normal

देशात पेट्रोल-डिझेलचे संकट:अनेक राज्यांतील पेट्रोल पंप कोरडे; सरकार-तेल कंपन्या म्हणतात, घाबरू नका, पुरवठा सामान्य

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता आहे का? हा प्रश्न विचारला जात आहे कारण गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोल पंप कोरडे पडल्याच्या बातम्या येत आहेत. राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजराज आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी लांबच लांब रांगा लागत आहेत. बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचा पुरवठा कमी केलाय आणि मागणीच्या एक चतुर्थांशच पुरवठा असल्याचा दावा पेट्रोलियम डीलर्सने केला आहे. मात्र, सरकार आणि तेल कंपन्यांच्या दाव्यानुसार देशात इंधनाची कमतरता नाही.

राज्यांमध्ये मागणी वाढली

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने बुधवारी या प्रकरणावर एक निवेदन जारी केले. देशात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही, असे त्यात म्हटले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक यासारख्या काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणी विशिष्ट ठिकाणी वाढल्याचेही मंत्रालयाने मान्य केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन पुरेसे आहे. कृषी संबंधित क्षेत्रामधील घडामोडींमध्ये वेग आल्याने मागणीत वाढ दिसून येत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. डेपो आणि टर्मिनल्समध्ये स्टॉक वाढवून या समस्येचा सामना करण्यासाठी तेल कंपन्यांनी तयारी केली आहे.

तेल कंपन्याचा सामान्य उपलब्धता असल्याचा दावा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक (विपणन) व्ही. सतीश कुमार यांनी ट्विट केले की, "प्रिय ग्राहक, आमच्या रिटेल आउटलेटवर उत्पादनाची उपलब्धता सामान्य आहे. घाबरू नका अशी आमची विनंती आहे.'

भारत पेट्रोलियमने असेही म्हटले आहे की, “आम्ही सर्वांना खात्री देतो की आमच्या नेटवर्कवरील सर्व इंधन केंद्रांवर पुरेशी उत्पादन उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

हिंदुस्थान पेट्रोलियमनेही या प्रकरणावर ट्विट करून लोकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “HPCL देशाची सतत वाढणारी इंधनाची मागणी पूर्ण करत आहे आणि पुरवठा साखळीमध्ये उत्पादनाच्या उपलब्धतेची खात्री देते. ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. बाजारात जिथे जिथे इंधन स्टेशन आहेत तिथे ऑटो इंधनाचा अखंड पुरवठा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

तज्ञ काय म्हणाले?

ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा म्हणाले की, आपल्या देशात तेलाचा तुटवडा नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तेल उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी भारताकडे पुरेसे डॉलर्स उपलब्ध आहेत. तेल कंपन्यांना तेल विकून तोट्याचा मुद्दाही योग्य नाही.

अनेक राज्यांमध्ये इंधनाचा तुटवडा असल्याच्या बातम्या

राजस्थानमध्ये 1,000 हून अधिक पंप कोरडे

कालच राजस्थानमधून बातमी आली होती की, येथील डिझेल-पेट्रोल पुरवठा अघोषित कपात केल्यामुळे 1,000 हून अधिक पंप कोरडे पडले आहेत. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनीत बगई म्हणाले की, राज्यातील पेट्रोल पंप केवळ आयओसीएलच्या आधारे चालत आहेत, कारण एचपीसीएल आणि बीपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे कमी केला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर पेट्रोल पंप बंद करावा लागेल.

मध्य प्रदेशातील पुरवठा सामान्य करण्याची मागणी

मध्य प्रदेशातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे पेट्रोलपंप मालकांसह सर्वसामान्य नागरिकही नाराज झाले आहेत. तेलाचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी पेट्रोल पंप मालकांनी सरकारकडे केली आहे. पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष अजय सिंह म्हणाले, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा 40 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही.

गुजरातमध्ये अचानक वाहनांच्या रांगा

गुजरातच्या अहमदाबाद शहरात अचानक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या. सौदी अरेबियातून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी रात्री उशिरा शहरातील पेट्रोल पंपांवर गर्दी केली. शेकडो वाहने अचानक आल्याने पंपांची यंत्रणा कोलमडून त्यांना ते बंद करावे लागले. सुरतमधूनही पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या बातम्या येत आहेत.

अहमदाबादमधील कारगिल पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे.
अहमदाबादमधील कारगिल पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे.

पंजाबच्या माझा-दोआबामध्ये 50 पेट्रोल पंप बंद

पंजाबमधील अनेक पंप बंद पडल्याचेही वृत्त आहे. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा न झाल्यामुळे पंजाबमधील माझा आणि दोआबा भागातील सुमारे 50 पेट्रोल पंप शनिवारी बंद राहिले. याशिवाय इतर अनेक पेट्रोल पंपांवर 5 ते 6 तास तेल मिळाले नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, रविवारी येथील परिस्थिती पूर्वपदावर आली.

हिमाचल प्रदेशात 3 दिवसात तेल पुरवठा

हिमाचल प्रदेशातील सिरमौर, पोंटा साहिब नहान, खादरी, रेणुकाजीसह काही शहरांमध्ये इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. काही पंप रिकामे आहेत, काहींमध्ये थोडेसे इंधन शिल्लक आहे. शिमला येथील पेट्रोल पंप ऑपरेटर सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेमध्ये खूप समस्या आहे कारण तेल कंपन्या तीन दिवसांत पुरवठा करत आहेत.

उत्तराखंडमध्ये अफवा पसरलेल्या वाहनांच्या रांगा

अशाच अफवांमुळे उत्तराखंडमध्ये शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी केली होती. डेहराडूनचे डीएम आर राजेश कुमार म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे रात्री उशिरापर्यंत वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तराखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या वृत्तानंतर पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
उत्तराखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या वृत्तानंतर पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

याशिवाय इतरही अनेक राज्ये आहेत जिथून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

याचे प्रमुख कारण केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून तेलाच्या वाढत्या किमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करताना तोटा सहन करावा लागत आहे, त्यामुळे त्यांनी पुरवठा कमी केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, मात्र वाढत्या महागाईच्या दबावाखाली सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करू देत नाही. त्यामुळे तेल कंपन्यांचा तोटा सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक तेलाचा पुरवठा कमी करून तूट कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कंपन्या पंप मालकांवर त्यांची थकबाकी भरण्यासाठी दबाव आणत असल्याची शक्यता आहे. जे पंप मालक थकबाकी भरत नाहीत, त्या भागात पुरवठा कमी केला जात आहे. कंपन्या रोख पेमेंटवर तेल देत आहेत.

तुमच्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेल कसे पोहोचते?

  • भारत आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त पेट्रोलियम आयात करतो.
  • परदेशातून येणारे कच्चे तेल रिफायनरीमध्ये जाते, तेथून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ वेगळे काढले जातात.
  • त्यानंतर ते तेल कंपन्यांकडे जाते. उदाहरणार्थ इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम. येथून ते आपला नफा कमावतात आणि ते पेट्रोल पंपावर पोहोचवतात.
  • पेट्रोल पंपावर आल्यानंतर पेट्रोल पंप मालक त्याचे कमिशन जोडतो. केंद्र आणि राज्य सरकारने लावलेला कर जोडला जातो व तुम्हाला सर्व करांसह पेट्रोल मिळते.

केंद्र सरकारने केली होती उत्पादन शुल्कात कपात

21 मे रोजी जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांनी कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सरकार पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये उत्पादन शुल्क आकारत होते. या कपातीनंतर पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.80 रुपये अबकारी शुल्क आकारण्यात आले.

तेल पुरवठादार आता रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतील
राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे किरकोळ विक्रेते आता रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करतील जेणेकरून टँकरमधून पेट्रोल पंपापर्यंत जास्तीत जास्त इंधनाचा पुरवठा करता येईल. बुधवारी तेल मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली. तेल उद्योगाच्या आकडेवारीनुसार, 2021 च्या तुलनेत जून 2022 मध्ये पेट्रोलचा वापर 54% आणि डिझेलचा वापर 48% वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...