आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समोसा तळलेल्या तेलातून विमान उडवणार; कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी इंधन निर्मितीची प्रक्रिया सुरू

दिव्य मराठी विशेष2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या हवाई उद्योगास पर्यावरणपूरक करण्याचे प्रयत्न

तुमच्या घरी समोसा किंवा पकोडा तळल्यानंतर शिल्लक राहिलेले तेल विमान उड्डाणासाठी वापरले जाऊ शकते. नूतनीकरणायोग्य डिझेल तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी नेस्ते ओवायजे लो-कार्बन जेट फ्यूलसाठी नवी बाजारपेठ तयार करत आहे. नेस्तेनुसार, चिरंतन हवाई इंधन म्हणजे, एसएएफ कार्बन उत्सर्जन कमी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या एअरलाइन्ससाठी उपयोगी ठरेल. कोविड महामारीनंतर पुन्हा सुरू झालेली हवाई वाहतूक आधीपेक्षा जास्त पर्यावरणपूरक मानसिकतेची आहे. त्यामुळे या इंधनाचे जास्त दर त्याच्या विक्रीवर परिणाम करणार नाहीत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर वैनेकर म्हणाले, लोक पुन्हा हवाई प्रवास सुरू करतील, मात्र ते चिरंतन पद्धतीने प्रवास पसंत करतील. आम्ही चिरंतन डिझेलसाठी बाजारपेठ तयार करत आहोत.

फिनलंडची कंपनी नेस्ते आपल्या रिफायनरीमध्ये जास्त प्रमाणात सस्टेनेबल जेट फ्युएल निर्मितीसाठी १६,०० कोटी रुपयंाची गुंतवणूक करणार आहे. आपल्या सिंगापूरच्या कारखान्यात विस्तारानंतर कंपनी २०२३च्या अखेरीस संयुक्त रूपात आपले एसएएफ उत्पादन सध्याच्या क्षमतेच्या १००,००० लाख टनांवरून वाढून १५ लाख टन वार्षिक करण्यात सक्षम होईल. विमान कंपन्याही उत्सर्जन कमी करण्यासाठी बायोफ्युएल पसंत करत आहेत.

सस्टेनेबल एअरलाइन्स फ्युएल कसे तयार करतात?

एसएएफ खराब आणि वापरलेले तेल उदा. कुकिंग ऑइलमधून तयार केले जाते. हे पारंपरिक जीवाश्मआधारित केरोसीनच्या तुलनेत ८०% पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करते. नेस्तेच्या रिफायनरीतून निघण्याआधी जीवाश्म इंधनात जास्तीत जास्त ५०%पर्यंत एसएएफ मिसळले जाते. कंपनीनुसार, सामान्य शिपमेंटमध्ये जवळपास ३५%- ४०% रिन्युएबल फ्युएल असते. विमानतळावर एसएएफ विमानातील रिफ्युएलिंग टँकमध्ये नियमित ईटीएफसोबत मिसळले जाते.

बातम्या आणखी आहेत...