आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी दिलासा नाही:चित्रा आणि आनंदचा जामीन अर्ज फेटाळला, सीबीआय म्हणाली- पुराव्यांशी छेडछाड शक्य

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना विशेष सीबीआय कोर्टाकडून झटका बसला आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला. सीबीआय मे 2018 पासून या प्रकरणाचा तपास करत आहे. रामकृष्ण आणि सुब्रमण्यम दोघेही तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.

को-लोकेशन ब्रोकर्सना त्यांची सिस्टीम ठेवण्यास आणि एक्सचेंजच्या सर्व्हरच्या जवळ ऑपरेट करण्यास अनुमती देते. एक्सचेंज सर्व्हर जवळ असल्याने, अशा दलालांना इतरांपेक्षा फायदा होतो कारण डेटा ट्रान्समिशनला कमी वेळ लागतो. ही सुविधा नसलेल्या दलालांपेक्षा को-लोकेशन सुविधेसह ब्रोकर्सच्या ऑर्डर्स एक्स्चेंजपर्यंत वेगाने पोहोचतात.

सीबीआय म्हणाली- जामिनामुळे पुराव्यांशी छेडछाड शक्य

सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, दोन्ही आरोपी प्रभावशाली पदांवर असल्यामुळे पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ शकते. जामीन दिल्याने तपासावरही परिणाम होऊ शकतो. अलीकडेच रामकृष्ण यांना सेबीने ३ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

हिमालयाातील योगींसोबत महत्त्वाची माहिती शेअर

यापूर्वी, 6 वर्षांच्या तपासानंतर, सेबीने 190 पानांचा अहवाल जारी केला होता. एमडी आणि सीईओ या त्यांच्या कार्यकाळात चित्रा यांनी हिमालयातील एका योगीसोबत एनएसईची अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली होती.

त्यांनी आनंद सुब्रमण्यम या मिड-लेव्हल मॅनेजरची 15 लाख रुपयांच्या पॅकेजवरुन 1.38 कोटी रुपयांच्या पॅकेजवर नियुक्ती केली होती. आनंद सुब्रमण्यम हेच योगी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...