आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • PLI Scheme For Self reliance In APIs And Medical Devices, Reduction In Imports Of 53 Types Of APIs And 4 Types Of Medical Devices

दिव्य मराठी विशेष:एपीआय आणि वैद्यकीय उपकरणांत आत्मनिर्भरतेसाठी पीएलआय योजना, 53 प्रकारचे एपीआय व 4 प्रकारच्या वैद्यकीय उपकरणे आयातीत घट

शरद पांडेय | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता फार्मा आणि वैद्यकीय उपकरणात आत्मनिर्भर होण्याची तयारी

मोबाइल फोन उत्पादनात देशाला जगाचे हब बनवण्यासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला चांगल्या प्रतिसादामुळे उत्साहित केंद्र सरकारने आता औषधांसाठी वापरला जाणारा कच्चा माल म्हणजे अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट (एपीआय) आणि वैद्यकीय उपकरणांसाठी पीएलआय योजना लागू केली आहे. याअंतर्गत ५३ प्रकारचे अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट (एपीआय) आणि ४ विभागाच्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनावर रोख प्रोत्साहन मिळेल.

भारत सरकारच्या वतीने काढलेल्या अधिसूचनेनुसार सरकार देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या हेतूने वैद्यकीय क्षेत्रात पीएलआय योजना सुरू करत आहे, जी १० हजार कोटींपेक्षा जास्तची आहे. देशात औषधांसाठी कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकार २० टक्के लाभांश देईल. सध्या देशात औषधांसाठी ७० टक्केपेक्षा जास्त एपीआयची आयात केली जाते. याची किंमत सुमारे २२ हजार कोटी रुपये आहे. यातील ८० टक्क्यांच्या जवळपास केवळ चीनमधून आयात केली जाते, तर चीनमधून ८० ते ९० टक्के अँटिबायोटिक आयात होते. चीनसोबत झालेल्या वादानंतर सरकारने वैद्यकीय क्षेत्रात चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी ही योजना बनवल्याचे बोलले जाते. ६९४० कोटी रुपयांच्या योजनेचा कार्यकाळ आर्थिक वर्ष २०२१ ते २०२९-३० पर्यंत असेल.

वैद्यकीय उपकरणे निर्मितीला चालना देण्यासाठी 

देशात वैद्यकीय उपकरणे मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहेत. सुमारे ८५ टक्के वैद्यकीय उपकरणांची आयात होते. ज्याची एकूण किंमत सुमारे ३८ हजार कोटी रुपये आहे. पाच वर्षांत वैद्यकीय उपकरणांच्या बाजारात १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. वैद्यकीय उपकरणांत आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी पीएलआय योजना सुरू केली जात आहे.

योजनेत ४ विभागाच्या वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन होईल

> पहिला विभाग - कर्करोग काळजी / रेडिओथेरपी वैद्यकीय उपकरणे 

> दुसरा विभाग - रेडिओलॉजी आणि इमेजिंग डिव्हाइस आणि न्यूक्लियर इमेजिंग डिव्हाइसेस 

> तिसरा विभाग - अॅनेस्थेटिक्स आणि कार्डिओ रेस्पिरेटरी वैद्यकीय उपकरणे 

> चौथा विभाग - सर्व प्रकारचे इम्प्लांट्स

सध्या बहुतांश अशी औषधे आहेत, ज्यांच्यासाठी चीनवर अवलंबून राहावे लागते. त्याला दुसरा पर्याय नाही आणि जर युरोपातील देश पर्याय असतील तर ३० ते ४० टक्के महाग आहे. यामुळे चीनकडून घेणे आवश्यक आहे. सरकारद्वारा सुरू केली जात असलेली पीएलआय योजना देशात औषधांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. - अशोक मदान, कार्यकारी संचालक, इंडियन ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स