आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • PM Modi Talks To Start Ups Across The Country, Says 'make Dreams Global Not Local'

16 जानेवारीला साजरा केला जाणार नॅशनल स्टार्ट-अप डे:PM मोदींनी देशभरातील स्टार्ट-अप्सशी केली चर्चा, म्हणाले 'स्वप्नांना लोकल नाही तर ग्लोबल बनवा'

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील स्टार्ट-अपसोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करत म्हटले की, मी देशाच्या त्या सर्व स्टार्ट-अपला, सर्व इनोव्हेटिव्ह तरुणांना खूप-खूप शुभेच्छा देतो, जे स्टार्ट-अप्सच्या जगात भारताचा झेंडा बुलंद करत आहेत.

ते म्हणाले की, स्टार्ट-अपची ही संस्कृती देशाच्या दूर-दूरपर्यंत पोहोचण्यासाठी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वप्नांना लोकल नाही ग्लोबल बनवा
पीएम मोदी म्हणाले की, भारतातील स्टार्टअप्स जगातील इतर देशांमध्ये सहज पोहोचू शकतात. त्यामुळे तुमची स्वप्ने फक्त लोकल ठेवू नका, त्यांना ग्लोबल बनवा. हा मंत्र लक्षात ठेवा - लेट्स इनोव्हेट फॉर इंडिया, इनोव्हेट फ्रॉम इंडिया.

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स सुधारला
ते म्हणाले की, गेल्या वर्षी देशात 42 युनिकॉर्न तयार करण्यात आले होते. हजारो कोटी रुपयांच्या या कंपन्या स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण भारताचे वैशिष्ट्य आहेत. आज भारत झपाट्याने युनिकॉर्नचे शतक पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आणि मी मानतो की, भारताच्या स्टार्ट-अप्सचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे.

नावीन्यपूर्णतेबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की, जागतिक इनोव्हेशन इंडेक्समध्येही भारताच्या क्रमवारीत बरीच सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर आहे.

2013-14 मध्ये 4,000 पेटंट मंजूर करण्यात आले होते, तर गेल्या वर्षी 28,000 पेक्षा जास्त पेटंट मंजूर करण्यात आले. 2013-14 मध्ये जिथे सुमारे 70 हजार ट्रेडमार्क नोंदणीकृत झाले होते, तिथे 2020-21 मध्ये 2.5 लाखांहून अधिक ट्रेडमार्क नोंदणीकृत झाले आहेत. 2013-14 मध्ये केवळ 4 हजार कॉपीराईट मंजूर झाले होते, तर गेल्या वर्षी त्यांची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे.

विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नवनिर्मितीकडे आकर्षित केले पाहिजे
पीएम मोदी पुढे म्हणाले की, आमचा प्रयत्न देशात लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचे आकर्षण निर्माण करणे, इनोव्हेशन संस्थागत करणे हा आहे. 9 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना शाळेत इनोवेट करणे आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत ​​आहेत.

ड्रोनबाबत नवे नियम असोत किंवा नवीन अवकाश धोरण असो, अधिकाधिक तरुणांना नवनिर्मितीची संधी देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. आपल्या सरकारने आयपीआर नोंदणीशी संबंधित नियम सोपे केले आहेत.

स्टार्ट-अप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी सरकार बदल करत आहे
ते म्हणाले की, या दशकाला भारताचे techade (तंत्रज्ञानाचे दशक) म्हटले जात आहे. या दशकात इनोवेशन, इंटरप्रेन्योर आणि स्टार्ट-अप ईकोसिस्टम मजूत करण्यासाठी सरकार जे मोठ्या प्रमाणात बदल करत आहे, त्याचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत.

पहिले, इंटरप्रेन्योरशिपला, इनोव्हेशनलला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून मुक्त करणे. दुसरे, इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इंस्टीट्यूशनल मॅकेनिज्मची निर्मिती करणे. आणि तिसरे, तरुण इनोवेटर्स, तरुण नवोन्मेषकांचा हातखंडा करणे.

हे इनोव्हेशन, इंडस्ट्री आणि इनवेस्टमेंटचे नवे युग
पंतप्रधान पुढे म्हणाले की, हे नावीन्यपूर्णतेचे म्हणजेच कल्पना, उद्योग आणि गुंतवणूकीचे नवीन युग आहे. तुमचे श्रम भारतासाठी आहेत. तुमचा उद्योग भारतासाठी आहे. तुमची संपत्ती निर्मिती भारतासाठी आहे, रोजगार निर्मिती भारतासाठी आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करणे ही आज सरकारची प्राथमिकता आहे.

बातम्या आणखी आहेत...