आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • PM Mudra Yojana (Business Loan); All You Need To Know About Pradhan Mantri Mudra Scheme; News And Live Updates

जागतिक उद्योजक दिन विशेष:मुद्रा कर्ज घेऊन तुम्हीदेखील सुरु करु शकता स्वतःचा व्यवसाय; कोणत्याही हमीशिवाय व्यवसाय योजनेवर मिळेल कर्ज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कर्ज घेण्यासाठी व्यवसाय योजना दाखवणे गरजेचे

जगभरात 21 ऑगस्ट रोजी 'जागतिक उद्योजक दिन' साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हीदेखील स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारने चालवलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे हे कर्ज तुम्हाला स्वस्तात मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सर्वकाही....

कर्जासाठी हमी देण्याची नाही गरज
केंद्र सरकारने ही योजना 2015 मध्ये सुरू केली आहे. या योजनेतंर्गत छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध करुन देणे हे प्रमुख उद्देश आहे. यामुळे ज्या कोणाला स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना यामाध्यमातून कर्ज घेत येणार आहे. विशेष म्हणजे तुमचे आधीचे कोणतेही व्यवसाय असेल आणि आता त्याला पुढे नेण्याची इच्छा असेल तरीदेखील तुम्ही कर्ज घेऊ शकता.

10 लाखांपर्यंत मिळेल कर्ज
मुद्रा कर्जाचे वर्गीकरण 3 श्रेणींमध्ये केले जाते. यामध्ये पहिली श्रेणी शिशु कर्ज असून यामाध्यमातून 50 हजारांचे कर्ज दिले जाते. दुसरी श्रेणी किशोर असून यामाध्यमातून 50,000 ते 5 लाख रुपये दिले जाते. आणि शेवटच्या तरुण श्रेणीतून 10 लाख रुपयापर्यंत बँक कर्ज देते. त्यामुळे आपल्याला कामानुसार कर्जाचे वाटप केले जाते.

कर्ज घेण्यासाठी व्यवसाय योजना दाखवणे गरजेचे
तुम्हाला जर बँकेतून मुद्रा लोन घ्यायचे असेल सर्वप्रथम अर्जदाराला एक व्यवसाय योजना तयार करावी लागते. यासह कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्रे तयारी करावी लागतात. या कागदपत्रासोबत बँक तुम्हाला व्यवसाय योजना, प्रकल्प अहवाल, भविष्यातील उत्पन्नाचा अंदाज यासंबंधीची कागदपत्रे देखील विचारेल. जेणेकरून बँकेला तुमच्या गरजेची माहिती होईल. यामाध्यमातून तुम्हाला फायदा कसा होईल याची बँक खात्रीकरुन घेणार आहे.

किती द्यावा लागणार व्याज?
या योजनेचे वैशिष्टे म्हणजे यामध्ये कोणतेही व्याजदर निश्चित नाही. वेगवेगळ्या बँका कर्जावर वेगवेगळे व्याज आकारू शकतात. परंतु, व्यवसायाचे स्वरूप आणि गुंतलेल्या जोखमीच्या आधारे व्याजाचा दर निश्चित केला जातो. तसे, व्याज दर सहसा 10 ते 12% वार्षिक असते.

मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा?

 • सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे हे ठरवा. अर्जदार एकापेक्षा जास्त बँक निवडू शकतो. बँकेला कागदपत्रांसह कर्जाचे अर्ज भरत जमा करणे आवश्यक आहे.
 • मुद्रा कर्जासाठी अर्जासोबत तुम्हाला खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मुद्रा कर्ज अर्ज, व्यवसाय योजना किंवा प्रकल्प अहवाल, ओळखपत्र जसे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.
 • एकापेक्षा जास्त अर्जदारांच्या बाबतीत भागीदारीशी संबंधित कागदपत्रे (डीड), कर नोंदणी, व्यवसाय परवाना जमा करावा लागतो. यासोबतच कर्जाची रक्कम, व्यवसायाचे स्वरूप, बँक नियम इत्यादींवर अवलंबून कागदपत्रांची संख्या कमी -अधिक असू शकते.
 • उदाहरणार्थ, रहिवाशी कागदपत्रे, जसे की टेलिफोन बिल/वीज बिल इ. अर्जदाराचे 6 महिन्यांपेक्षा कमी जुने फोटो, मशीन किंवा इतर साहित्याची कोटेशन पावती, पुरवठादार/दुकानदाराची माहिती, श्रेणी (SC/ST/OBC/अल्पसंख्याक).
 • मुद्रा कर्ज देणाऱ्या इतर कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेत अर्ज करावा लागतो. अर्जासाठी आपल्याला इतर आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण व्यवसाय माहिती /योजना सादर करावी लागेल.
 • जर अर्ज योग्य आढळला तर बँक किंवा वित्तीय संस्था मुद्रा कर्ज पास करेल आणि अर्जदाराला मुद्रा कार्ड (डेबिट कार्ड) प्रदान केले जाईल. त्यानुसार तुम्ही खर्च करू शकता.

योजनेचे ठळक मुद्दे

 • या योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज घेता येते.
 • या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.
 • कर्जाची परतफेड करण्याची मुदत 5 वर्षांपर्यंत वाढवता येते.
 • यामाध्यमातून कर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाते, ज्याचा वापर व्यवसायाला गरज पडल्यावर होणाऱ्या खर्चासाठी करता येतो.
बातम्या आणखी आहेत...