आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील तरुणांना स्वावलंबी बनवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर छोट्या-छोट्या व्यवसायांत गुंतलेल्या लोकांवरही सरकार विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार योजना राबवत आहे. केंद्राची पीएम स्वनिधी योजनाही त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी आणि त्यांचे काम वाढविण्यासाठी केंद्र सरकार बिनव्याजी कर्ज देत आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कागदपत्रांची आवश्यकता नाही. खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. यातील खास बाब म्हणजे एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर, लाभार्थीला दुसऱ्यांदा कर्जाच्या स्वरूपात कोणत्याही व्याजदराशिवाय दुप्पट रक्कम मिळू शकते. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत फेडता येते. याशिवाय, मासिक हप्त्यांमध्येही परतफेडचा पर्याय आहे.
केंद्र सरकार या कर्जावर भरघोस सबसिडी देत आहे. यासोबतच कर्जदारांना कॅशबॅकही दिला जात आहे. या योजनेची वैधता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांसमोरील आर्थिक समस्या दूर करून त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पीएम स्वनिधी योजना काय आहे, अर्ज कसा करावा, याच्या अटी-शर्ती आणि प्रक्रिया नेमकी काय आहे याबद्दल जाणून घ्या...
काय आहे पीएम स्वनिधी योजना
ही केंद्र सरकारची योजना आहे. छोट्या व्यवसायातील लोकांना आर्थिक साहाय्य करणे आणि रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी व्यावसायिकांचा व्यवसाय वाढवणे आणि त्यांच्या व्यवसायातील आर्थिक समस्या दूर करणे हा याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 50 हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते. एका वर्षात जर ही रक्कम परत केली, तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरंटरची गरज भासणार नाही. डिसेंबर 2024 पर्यंत गरजू लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु, एका कुटुंबातील एकच व्यक्ती पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊ शकते.
काय आहेत अटी आणि शर्ती?
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड मतदार ओळखपत्र शिधापत्रिका पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
याशिवाय, केंद्राने या योजनेविषयी सर्वसाधारणपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ती तुम्हाला या लिंकवर वाचता येतील.
पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा कराल?
लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाहीयेत. यामुळे कुणाच्या भूलथापांना किंवा फसवणुकीला बळी पडू नका.
अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी हेही वाचा..
रेंट अॅग्रीमेंट 11 महिन्यांचे का असते: 12 वा महिना मालकासाठी का असतो धोक्याचा; जाणून घ्या- भाडे करारनामा करण्याची प्रक्रिया
जेव्हा आपण घर भाड्याने घेतो, तेव्हा आपल्याला भाडे करारनामा (Rent Agreement) करावा लागतो. मात्र, तुम्हाला भाडे करारनामा बद्दलची ही महत्त्वाची बाब माहित आहे का, तो म्हणजे रेंट अॅग्रीमेंट केवळ 11 महिन्यांचेच का असते, अर्थात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मुळात 12 महिन्यांचे एक वर्ष असते, मग करार अकरा महिन्यांचा का केला जातो. केवळ 11 महिन्यांचे अॅग्रीमेंट मालक आणि भाडेकरूला का बंधनकारक असते. परंतू यामागे नेमकं नक्की काय कारण असते, याबाबत येथे वाचा संपूर्ण बातमी...
NPS खाते काय असते, कशी बचत करणार:वाचा- राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बचतीचे फायदे; या खात्यातून एकाचवेळी काढता येईल 60% रक्कम
सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक समस्या उद्भवू नये म्हणून बहुतांश लोक नोकरीत असताना आर्थिक नियोजन सुरू करतात. यासाठी ते एफडी, आरडी, म्युच्युअल फंडासारखे पर्याय निवडतात. भारतात शासकीय नोकरदारांना पेन्शनचा लाभ मिळतो. पण खासगी नोकरदार वर्गाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खासगी नोकरदार बचत, गुंतवणुकीवर भर देत आर्थिक बाजू पक्की करण्याचा प्रयत्न करतात. येथे वाचा संपूर्ण बातमी
नोकरी सोडली आता ग्रॅच्युइटीची रक्कम हवी:जाणून घ्या - ग्रॅच्युइटीची रक्कम मिळविण्याची प्रक्रिया, कधी अन् कसा करायचा अर्ज
शासकीय नोकरी असो किंवा खासगी कंपनीतील कर्मचारी त्यांना ग्रॅच्युइटीच्या कायद्यातंर्गत ठराविक कालावधीपर्यंत एकाच संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम केल्यावर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळतो. जेव्हा एखादा कर्मचारी सलग 5 वर्षं एखाद्या कंपनीसोबत काम करतो, तेव्हा त्याला ग्रॅच्युइटीच्या ठरलेल्या नियमानुसार त्याची रक्कम दिली जाते. एखादा कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा त्याने नोकरीचा राजीनामा दिला, तरीही त्याला ग्रॅच्युइटी दिली जाते. येथे वाचा संपूर्ण बातमी
नोट फाटली, रंग लागला तर चिंतेत पडू नका : काय सांगतो RBIचा नियम; जाणून घ्या- फाटलेल्या नोटा कशा मिळतात बदलून
आपल्या खिशात असलेल्या नोटांवरून आपल्या मनात अनेक विचार कायम येत असतात. खास करून कोणाकडूनही नोट घेताना आपण नोट फाटकी तर नाही ना, त्यावर काही लिहलेले नाही ना, याची पूर्ण खात्री करून स्वीकारतो. तर आपल्याकडे असलेली अशी फाटकी नोट देखील अनेक दुकानदार घेत नाहीत. चांगली नोट द्या, अशी मागणी दुकानदार देखील आपल्याकडे करतो. अर्थात यात काहीच चूकीचे नाही. मग फाटलेल्या नोटांचे करायचे काय, याबाबत वाचा ही संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.