आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादनात वाढ:मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तेजीने मार्चमध्ये पीएमआय इंडेक्स 56.4 वर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन ऑर्डर, उत्पादनात वाढ होण्याबरेाबरच मागणी वाढणे आणि खर्चांसंबंधी दबाव कमी झाल्याने भारतात मॅन्युफॅक्चरिंग उपक्रमांना गेल्या महिनाभरात वेग आला. मार्चमध्ये एसअँडपी ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ५६.४ वर पोहोचला, जो ३ महिन्यांचा उच्चांक आहे. फेब्रुवारीत हे ५५.३वर होते. यांच्या मते, सलग २१व्या महिन्यात ओव्हरऑल ऑपरेटिंग कंडीशनमध्ये सुधारणा झाली. सर्वेक्षणाच्या मते, पुरवठा साखळीवरील दबाव कमी झाल्यामुळे आणि कच्च्या मालाची वाढती उपलब्धता यामुळे खर्चाशी संबंधित चलनवाढ मार्चमध्ये अडीच वर्षांतील दुसऱ्या नीचांकी पातळीवर आली. व्यवसायात थोडी वाढ झाल्यामुळे कंपन्यांनी नवीन भरती केली नाही.