आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानची ऑल निपॉन एअरवेज (एएनए)च्या विमानांवरदेखील पोकेमॉन पात्र दिसणार आहेत. िवशेष म्हणजे, एएनएने आपल्या बोइंग ७८७-९ला पोकेमॉन पात्र पिकाचू समर्पित केले आहे. या विमानाला पिकाचू जेट एनएच नाव दिले आहे. पिकाचूशी संबंधित गोष्टी विमानाच्या बाहेर नाही तर आतही दिसतील. यासंबंधीचा मालही प्रवाशांना विकला जाईल. एएनए आणि पोकेमॉन कंपनीमध्ये करारानुसार पिकाचू एअर अॅडव्हेंचर्स नावाची कंपनी बनवली आहे. त्याअंतर्गत विशेषकरून जेट विमानांना पिकाचू थीममध्ये पेंट केले जाईल. पिकाचू जेटमध्ये २४६ प्रवासी बसू शकतात. त्यात ४० बिझनेस क्लास, १४ प्रीमियम इकोनॉमी आणि १९२ इकोनॉमी क्लासच्या सीट आहेत. ४ जून २०२३ पासून हे जेट देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करेल. त्याचे टोकियो ते सिएटलपर्यंतचे प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे भाडे १.८ लाख ते ३.५ लाख आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.