आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुक:पोर्टफोलिओ प्रोफेशनल टीमच्या हाती; गुंतवणूकदारांचे होणार नाही नुकसान

अभिषेक विश्नोई आणि आशुतोष जोशी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे वॉरेन बफे या नावाने प्रख्यात दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांचे पोर्टफोलिओ पाहून निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदारांना धोरण बदलण्याची गरज नाही. सुमारे ३२ हजार कोटी रुपयाच्या त्यांच्या पोर्टफाेलिओमध्ये सहभागी असलेले बहुतांश शेअर मंगळवारी ४% वाढून बंद झाले. जाणकारांच्या मते, झुनझुनवाला (बिग बुल)च्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअर्सवर त्यांच्या जाण्याने फारसा फरक पडणार नाही. कारण त्यांच्या गुंतवणुकीची देखरेख कंपनीतील प्रशिक्षित लोक करत आहेत.

बिग बुलने जेव्हा गुंतवणूक सुरू केली होती, तेव्हा सेन्सेक्स १५० अंकावर होता. तो आता ५९,८०० पेक्षा वर निघून गेला. वेल्थमिल्स सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट क्रांती बाथिनीच्या मते, झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्यांचा सहभाग होता, ज्यांनी गुंतवणुकीनंतर बरीच उंची गाठली. ज्या कंपन्यांमध्ये झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली, त्यांच्या व्यवस्थापनात कधीही हस्तक्षेप केला नाही. झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध स्थापन केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली होती आणि अनेक कंपन्यांच्या मंडळांत सहभागी होते. झुनझुनवाला यांची सर्वात मोठी गुंतवणूक टायटनमध्ये होती. याव्यतिरिक्त स्टार हेल्थ, टाटा मोटर्स, क्रिसिल, फोर्टिस हेल्थकेअर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील प्रमुख शेअर्स होते. २०२० ते २०२१ दरम्यान त्याची एकूण संपत्ती प्रचंड वाढली आहे आणि ११०% पेक्षा वाढ झाली. ब्लूमबर्गच्या आकड्यांनुसार, बिग बुलचे पोर्टफोलिओमध्ये जून तिमाहीच्या शेवटी एकूण ३२ शेअर्स होते आणि नेटवर्थ सुमारे ३२ हजार कोटी रुपये होते. मंगळवारी, त्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच, त्याच्या पोर्टफोलिओमधील समभाग खुल्या बाजारात ०.५-४% वाढले.

पोर्टफोलिओत टॉप-६ शेअर कंपनी गुंतवणूक टायटन कं. लि. 11109 स्टार हेल्थ 7015 मेट्रो ब्रँड्स 2230 टाटा मोटर्स 2079 क्रिसिल 1301 फोर्टिस हेल्थकेअर 897 (गुंतवणूक : कोटी रुपयात, स्रोत-ब्लूमबर्ग)

बातम्या आणखी आहेत...