आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Positive News । 24 Year Old Tusharjit Bharadwaj Started Solar Panel Startup To Promote Solar Energy; Earning Lakhs Every Month, Gave Employment To Many People

पॉझिटिव्ह स्टोरी:24 वर्षीय तुषारजीतने सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला स्टार्टअप, महिन्याला करतो लाखोंची कमाई; मुंबई-पुण्यातही उभारणार प्रशिक्षण केंद्र

नोएडा (अरशद नसीम)22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज संकटाच्या या युगात सोलर पॅनलची मागणी झपाट्याने वाढत आहे. अनेक आता सोलर व्यवसायाकडे वळालेले आहे. देशातील अनेक राज्यात सोलर पॅनेल पाहायला मिळत आहे. त्याद्वारे वीजेचे संकट कमी केले जात आहे.

वाढती सोलारची मागणी बघता नोएडा एका व्यक्तीने सोलरचे व्यवसाय सुरू केले आहे. नोएडातील तुषारजीत भारद्वाज यांनी सोलर एनर्जी टेक्नॉलॉजी नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. याद्वारे ते देशातील अनेक भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम करत आहेत. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम बॅटरी बनवण्याचे काम देखील तुषारजीत करत आहेत.

तुषारजीत यांचे वय 24 असून, गेल्या दोन वर्षांपासून या क्षेत्रात ते काम करत आहेत. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या त्यांच्या स्टार्टअपने आतापर्यंत 17 प्रकल्पांवर काम केले आहे. तुषारजीतने या स्टार्टअपच्या माध्यमातून 22 जणांना रोजगारही दिला आहे. यासोबतच ते या स्टार्टअपच्या माध्यमातून लाखोंचा व्यवसाय करत आहेत.

याशिवाय तुषारजीतच्या कंपनीने दोन इनोव्हेशन्सही तयार केले आहेत. ते नवीन वर्षाच्या जानेवारीत लॉन्च करणार आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने सौर लिथियम इनव्हर्टर तसेच पाऊच सेलमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे एलएसपी विकसित केले आहे, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढेल आणि वाहनाची श्रेणी वाढण्यास मदत होईल.

युकेतील डिग्री करताना आली कल्पना
तुषारजीतच्या शिक्षणावर आपण एक नजर टाकूया, चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठातून त्यांनी बॅचलर डिग्री केली आहे. यानंतर, 2019 मध्ये, ते पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. तेथे त्यांनी सीफिल्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. मास्टरमध्ये शिकत असताना त्यांनी सोलर एअर कंडिशनिंगच्या प्रकल्पावर काम केले.

यानंतरच त्यांना आपल्या देशात सोलर पॅनल स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना सुचली होती. भारतात परतल्यानंतर तुषारजीत यांनी सुमारे दीड वर्ष संशोधन केले आणि यावर्षी जानेवारी महिन्यात सुमारे 2 लाख रुपये खर्चून व्यवसाय सुरू केला. यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरउद्योगात अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी अनेक सुधारणा केल्या होत्या. या अंतर्गत तुषारजीतला त्याच्या स्टार्टअपमध्ये खूप मदत मिळाली.

व्यवसाय सुरू केल्यानंतर मार्चमध्येच तुषारजीत यांना पहिला प्रोजेक्ट मिळाला. हळूहळू त्याचे प्रोजेक्ट लोकांना आवडू लागले आणि आता त्याला मोठमोठाले प्रोजेक्ट मिळत आहे. तुषारजीतने अल्पावधीत अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत. 2020 मध्ये त्यांना इंडियन अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना तरुण उद्योजक 2021 ही पदवी देण्यात आली. याशिवाय तुषारजीतला यंग ग्लोबल आयकॉन 2021 चा किताबही प्राप्त झाला आहे.

सोलर प्लांटची स्थापना प्रक्रिया
तुषारजीतच्या टीममध्ये 22 जण आहेत. टीमचे लोक आधी साइट म्हणजेच ठिकाण ओळखतात. त्यानंतर त्या जागेचे सर्वेक्षणा करण्यात येते. तुषारजीत यांच्या कंपनीचे अभियंते येथे कोणत्या प्रकारचा प्लांट उभारला जाऊ शकतो हे पाहतात. मॉड्यूलची उंची, संरचनेची देखील काळजी घेतली जाते. त्यानंतर सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन सोलर प्लांट बसवला जातो. तसेच ग्राहकाच्या गरजेनुसार देखील प्लांट तयार करण्यात येते.

सौर ऊर्जा उद्योगात भविष्य

तुषारजीत यांनी दिव्य मराठीला सांगितले की, आगामी काळात सौरऊर्जेचा व्यवसाय खूप वाढणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबरोबरच महागाईचा फटका जनतेला बसत असून विजेचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे, ते पाहता आगामी काळात सर्वत्र सौरऊर्जेचा वापर होईल, असे वाटते. सौरऊर्जेची मागणी भविष्यातच नव्हे तर सध्याच्या काळातही खूप वाढली आहे.

लोकांना मदत करण्याचा उद्देश
तुषारजीत म्हणाले की, या स्टार्टअपद्वारे आम्ही केवळ आमचा फायदाच पाहिला नाही तर लोकांनाही मदत करू शकेल असा व्यवसाय सुरू केला आहे. यासोबतच खेड्यापाड्यातील व ग्रामीण भागातील लोकांची विजेच्या समस्येतून सुटका होऊ शकते. कंपनीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी म्हणजेच पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही एक गाव दत्तक घेणार आहोत, जिथे आम्ही मोफत सोलर प्लांट बसवू, जेणेकरून गावातील लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता येतील. असे तुषारजीत म्हणाले.

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
तुषारजीत लवकरच त्यांच्या स्टार्टअपद्वारे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. यामध्ये ते लोकांना सौरऊर्जेचे प्रशिक्षण देतील. लोकांना जागरुक करण्यासोबतच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुषारजीत मुंबई, पुणे, लखनौ आणि नोएडा येथे प्रशिक्षण केंद्रे उघडण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी 6 तज्ञांची नियुक्ती केली आहे, जे लोकांना प्रशिक्षण देतील.

बातम्या आणखी आहेत...