आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाववाढ:आवक कमी झाल्याने 40-50 रु. किलोपर्यंत पोहोचला बटाटा, बटाट्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही

नवी दिल्ली, इंदूर, भोपाळ, रायपूर, रांची4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्पादन जास्त तरीही बटाट्याच्या भावात या वर्षी तेजी

मान्सून परतीनंतर भाज्यांचे नवे पीक आल्यावर विविध भाज्यांच्या किमती थोड्या घटू शकतात. मात्र, महागड्या बटाट्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता नाही. या वर्षी १७ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत असून २५ ऑक्टोबरला दसऱ्यासह सांगता होणार आहे. नवरात्रीत लोक नऊ दिवसांच्या उपवासात बटाट्याचा जास्त वापर करतात. यामुळे दरवर्षी नवरात्रीदरम्यान बटाट्याची विक्री वाढते. दिल्लीच्या आझादपूर बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत बटाट्याचा ठाेक भाव १२ ते ५१ रु. प्रतिकिलो चालू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बटाट्याची किरकोळ किंमत ४०-५० रु. प्रतिकिलो चालू आहे. इंदूरमध्ये ठोक भाव २२-२४ रु. आणि किरकोळमध्ये ४०-५० रु. किलो चालू आहे. रायपूमध्ये २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान लॉकडाऊन होता.

रायपूमध्ये २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान लॉकडाऊन होता. यादरम्यान भाजी मंडई बंद होती आणि रिटेलमध्ये किंमत ८० रु.किलोपर्यंत होती. सोमवारी ठोक किंमत ३२-३७ रु. आणि रिटेलमध्ये ५० रु. किलो राहिली. भोपाळमध्ये एका पंधरवाड्याआधी बटाट्याची किरकोळ किंमत ३०-३५ रु. किलो चालू होती. आता हा भाव ४० रु. किलो आहे. रांचीत ठाेक किंमत २८-३० रु. किलो आणि रिटेल किंमत ३५-४० रु. िकलो चालू आहे. आता हा ४० रु. किलो आहे. दिल्लीत आझादपूर मंडीच्या बटाटे-कांदा व्यापारी संघटनेचे सरचिटणीस राजेंद शर्मा म्हणाले, बटाट्याच्या किमतीतील वाढ प्रामुख्याने या मंडीत आवक घटल्याने झाली. आझादपूर मंडईत बटाट्याची आवक गेल्या वर्षापासून सुमारे ४०-५० टक्के कमी राहिली. यामुळे किमतीत गेल्या वर्षीपेक्षा दुपटीहून जास्तीची वाढ झाली आहे. बटाट्याचे नवे पीक नोव्हेंबरअखेरपर्यंत बाजारात आल्यावर बटाट्याच्या किमतीत घट येईल.

उत्पादन जास्त तरीही बटाट्याच्या भावात या वर्षी तेजी
कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या अग्रिम उत्पादनाच्या आकड्यांनुसार, पीक वर्ष २०१९-२० दरम्यान देशात बटाट्याचे उत्पादन ५१३ लाख टन झाले. २०१८-१९ मध्ये देशात बटाट्याचे उत्पादन ५०१.९० लाख टन झाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser