आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • PPF, NSC Including All Small Savings Schemes Will Continue To Get As Much Interest As Before, The Government Has Withdrawn The Decision Of Deduction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चूक-भूल माफ:PPF आणि फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे, सीतारमण म्हणाल्या - 'चुकून जारी झाला होता आदेश'

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याज दर कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 एप्रिल रोजी सोशल मीडिया साइटवरुन हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. आता या योजनांवर लागू असलेले व्याज दर मागील तिमाहीप्रमाणेच राहतील.

अर्थमंत्री काय म्हणाल्या?
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की लहान बचत योजनांना लागू असलेले दर त्याच पातळीवर राहतील, जे आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीत होते. त्या पुढे म्हणाल्या की दर कमी करण्याचा पूर्वीचा आदेश लवकरच मागे घेतला जाईल.

निर्णय 12 तासात परत घेतला
31 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याज दर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सकाळी आठच्या सुमारास हा निर्णय मागे घेण्यात आला.

यापूर्वी किती कट करण्यात आले होते

स्कीमहे व्याज दर करण्यात आले होते (% मध्ये)व्याज दर (% मध्ये)
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम6.507.40
सुकन्या समृद्धी योजना6.907.60
PPF6.407.10
किसान विकास पत्र6.206.90
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट5.906.80
मंथली इनकम स्कीम6.606.60
टाइम डिपॉजिट4.40 से 6.205.50 से 6.70
रेकरिंग डिपॉजिट5.305.80
सेविंग अकाउंट3.504.00

गतवर्षी 1 एप्रिल 2020 रोजी सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी केले होते. तेव्हा यांचे व्याजदर 1.40% ने कमी केले होते. यानंतर 31 मार्च 2021 रोजी कट करण्याचा निर्णयही घेण्यात आला जो आज मागे घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...