आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजकाल तुम्ही पैसे गुंतवण्याची विविध योजना शोधत असता. जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला चांगले व्याज मिळेल, तर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि आवर्ती ठेव (RD) योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. दर महिन्याला या योजनांमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही सहजपणे एक मोठा निधी तयार करू शकता. आम्ही तुम्हाला या योजनांबद्दल सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यामध्ये गुंतवणूक करू शकता...
PPF मिळते 7.1 % व्याज
तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली, परतावा किती मिळेल?
या योजनेअंतर्गत, जर तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 1 हजार रुपये गुंतवले तर 15 वर्षांनंतर तुम्हाला सुमारे 3.20 लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला 1.40 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल.
आरडीला मिळते 6.2 % व्याज
15 वर्षे दरमहा 1000 गुंतवले, तुम्हाला किती मिळेल परतावा?
या योजनेअंतर्गत, जर तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 1 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला सुमारे 2.93 लाख रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला 1.13 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल.
गुंतवणूक कुठे करायची?
जर तुम्ही तुमचे पैसे 15 वर्षांसाठी गुंतवू शकत असाल तर पीपीएफ योजना ठीक राहील. त्यावर 7.1% व्याज मिळत आहे. त्याचवेळी, RD वर 6.2% व्याज दिले जात आहे. पण यात 5 वर्षांचा लॉक इन कालावधी देखील आहे. जो PPF पेक्षा खूपच कमी आहे. तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्ही तुमच्यासाठी योग्य स्किम निवडू शकता.
हे ही वाचा
पीपीएफ अकाऊंट कसे उघडतात:तुम्हाला कसा होतो फायदा, किती मिळतो परतावा; काय आहेत नियम- वाचा सविस्तर
आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना आणि गुंतवणूकीचा दीर्घकालीन उत्तम म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजनेकडे पाहीले जाते. जी आकर्षण व्याजदर आणि गुंतविलेल्या रकमेवर चांगलावा परतावा देते. परंतू तुम्हाला माहिती आहे का, पीपीएफ अकाऊंट नेमकं कोणाला उघडता येते. त्यासाठी किती खर्च लागतो. वर्षभर किती गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी काय नियम असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
FD आणि RD मध्ये काय असतो फरक:गुंतवणूक कशी कराल, किती मिळेल परतावा, आदी प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून
गुंतवणूकीचा तसेच पैशांची बचत करण्याचा विषय जेव्हा आपल्या मनात येतो. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर FD आणि RD हे दोन पर्याय उभे राहतात. पण गुंतवणूक करायची झाल्यास या दोन प्रकारापैकी कशात गुंतवणूक करायची, असा प्रश्न उपस्थित होतो. यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता, हे त्वरीत समजत नाही. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.