आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलपासून बंद होणार PM वय वंदना योजना:दरमहा 9,250 रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन, जाणून घ्या- या योजनेविषयी सर्व काही

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) मध्ये गुंतवणूक करून तुम्ही स्वतःसाठी सहजपणे पेन्शनची व्यवस्था करू शकता. मात्र, ही योजना 1 एप्रिलपासून बंद होत आहे, त्यामुळे तुमच्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंतच संधी आहे.

PMVVY ही योजना 60 वर्षे आणि त्यावरील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. या योजनेत एकरकमी रक्कम जमा करून तुम्ही स्वतःसाठी पेन्शनची व्यवस्था करू शकता. चला तर जाणून घेऊया, या योजनेबद्दल....

पती-पत्नी दोघेही या योजनेचा घेऊ शकतात लाभ
पती-पत्नी दोघेही गुंतवणूक करू शकतात. योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा प्रति ज्येष्ठ नागरिक असून प्रति कुटुंब नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही पॉलिसीधारकाला वैद्यकीय तपासणीची गरज नाही.

यात किमान पेन्शन 1 हजार रुपये
या योजनेत दरमहा किमान 1 हजार रुपये आणि कमाल 9,250 रुपये पेन्शन मिळू शकते. महिन्याला 1 हजार रुपये पेन्शनसाठी तुम्हाला या योजनेत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये गुंतवावे लागतील. त्याच वेळी, 9,250 रुपये पेन्शनसाठी, 15 लाख रुपये जमा करावे लागतील.

गुंतवणूकीसाठी काय लागतात आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला फॉर्मसह खालील कागदपत्रे सादर करावी लागतील. पॅन कार्डची प्रत, पत्त्याच्या पुराव्याची प्रत (आधार, पासपोर्ट इ.), चेकची प्रत किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, जेणेकरून पेन्शनचे पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतील.

या योजनेत कोठे लाभ घेता येईल ?
सरकारने या योजनेसाठी एलआयसीशी करार केला आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एलआयसी कार्यालय किंवा एजंटला भेटू शकता. यासाठी एलआयसीने टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. 1800-227-717 वर कॉल करून तुम्ही या योजनेशी संबंधित माहिती मिळवू शकता.

बातम्या आणखी आहेत...