आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Pramod Mittal, Who Spent Rs 500 Crore On His Daughter's Marriage, Owes Rs 24,000 Crore

‘लक्ष्मीं’च्या भावावर लक्ष्मी रुसली:मुलीच्या लग्नात 500 कोटी खर्च करणाऱ्या प्रमोद मित्तल यांच्यावर 24 हजार कोटींची देणी; दिल्लीतील एका प्लॉट व्यतिरिक्त काहीही नाही

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 64 वर्षीय प्रमोद मित्तल यांनी कर्जाची घेतली होती हमी, आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

एकेकाळी मुलीच्या लग्नात ५०० कोटी रुपये खर्च करणारे, स्टील किंग लक्ष्मी मित्तल यांचे लहान भाऊ प्रमोद मित्तल ब्रिटनमध्ये दिवा‌ळखोर म्हणून घोषित केले जाऊ शकतात. ६४ वर्षीय प्रमोद मित्तल म्हणाले,‘माझ्यावर २३,७५० कोटी रु.ची थकबाकी आहे. एका व्यवहारात मी सर्व संपत्ती गमावली आहे. आता दिल्लीजवळील एका प्लॉटव्यतिरिक्त माझ्याकडे कमाईचे कुठलेही साधन नाही. माझ्याकडे एकूण शिल्लक दीड कोटी रुपये आहेत. माझे कुठलेही उत्पन्न नाही. माझ्यासमोर आता जगण्याचे संकट निर्माण झाले आहे. माझा मासिक खर्च २ लाख रुपये आहे.’

प्रमाेद यांचे प्रकरण १४ वर्षे जुने आहे. ते अनेक कर्जांसाठी हमीदार होते. पण फसवणुकीच्या प्रकरणात अडकल्यानंतर ते कर्जफेड करू शकले नाहीत. मोठे भाऊ लक्ष्मी मित्तल यांनी दोनदा जामीन घेऊन त्यांना कारवाईपासून वाचवलेही होते. प्रमोद यांच्यावर ब्रिटन स्टेट ट्रेंडिंग कॉर्पोरेशनची (एसटीसी) २,२१० कोटी रु. ची थकबाकी होती. २०१९ मध्ये फसवणुकीच्या आरोपात बोस्नियात अटकही झाली होती. हे प्रकरण जीआयकेआयएल या कोळसा प्रकल्पाशी संबंधित आहे. २००३ पासून प्रमोद तिचे संचालन करत होते. ते जीआयकेआयएलच्या सुपरवायझरी बोर्डाचे प्रमुख होते. त्यांना या प्रकल्पाच्या खात्यातून ८४ कोटी रु.च्या संदिग्ध व्यवहाराबाबत चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या वर्षी त्यांची ९२ कोटी रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली होती. तेव्हा दोघा भावांत संपत्तीचा वाद झाल्याची चर्चा माध्यमांत होती.

आर्सेलरच्या व्यवसायात प्रमोद यांचा हिस्सा २८,२०० कोटी रुपयांचा

आर्सेलर मित्तल या जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचा लक्झेमबर्ग येथील व्यवसाय ८४,६०० कोटी रु. चा आहे. त्यात प्रमोद यांचा हिस्सा २८,२०० कोटींचा आहे. ब्रिटनमध्ये अलीकडेच जारी टाइम रिच लिस्टनुसार, क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लबमध्ये त्यांचा २० टक्के एवढा हिस्सा आहे आणि एकूण गुंतवणूक ५० हजार कोटी रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...