आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु कर्जाद्वारे शॉपिंगचा कल:तीन चतुर्थांश लोकांची पसंती,  50% नी केली ईएमआय कार्डद्वारे खरेदी, 25% नी वापरले क्रेडिट कार्ड

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात लघु मुदतीच्या कर्जाद्वारे शॉपिंगचा कल वेगाने वाढत आहे. एका सर्व्हेत सहभागी ५०% पेक्षा जास्त लोक शॉपिंगसाठी ईएमआय कार्डला पसंती देत आहेत. क्रेडिट कार्ड २५% आणि बाय नाऊ पे लॅटर (बीएनपीएल) १०% लोकांची पसंत आहे. होम क्रेडिट इंडियाच्या वार्षिक कंझ्युमर स्टडी “हाऊ इंडिया बाेरोज’च्या नुसार टिअर १ आणि २ शहरातील एकूण तीन चतुर्थांशपेक्षा जास्त कर्ज घेणारे जेन जी आणि मिलेनिअल्स (३२ ते ४२ वर्ष)मध्ये डिजिटल लेंडिंग वाढली आहे. होम क्रेडिट इंटरनॅशनल नॉन बँक फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे.

50% क्रेडिट ग्राहकांना आवडते ईएमआय कार्ड क्रेडिट साधन पसंत ईएमआय कार्ड 50% क्रेडिट कार्ड 25% बीएनपीएल 10% इतर 15%

82% बंगळुरू रहिवाशांना एम्बेडेड फायनान्स आवडते शहर पसंत बंगळुरू 82% पाटणा 74% लखनऊ 69% जयपूर 68%

या १६ शहरांत केला सर्व्हे दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, पाटणा, रांची, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, लखनऊ, लुधियाना आणि पुणे.

55% जयपूर रहिवाशांची निवड डिजिटल कर्ज शहर पसंत जयपूर 55% पुणे 48% लुधियाना 47% लखनऊ 44% पुण्याच्या 75% लोकांना ऑनलाइन कर्ज आवडते शहर पसंत पुणे 75% अहमदाबाद 62% मुंबई 58% भोपाळ 42%

ग्राहकोपयोगी वस्तू, व्यवसाय, घराच्या दुरुस्तीसाठी घेत आहेत कर्ज {सर्व्हेत सहभागी ७५%पेक्षाही जास्त लोकांना कर्ज घेण्यात काही वाटत नाही. त्यांनी कंझ्युमर ड्युरेबल्स वा शॉपिंग प्रमाणेच व्यवसायाशी संबंधित गरजा वा घर नूतनीकरणासाठीही कर्ज घेतले आहे.

{६०% पेक्षा जास्त लोक इंटरनेट बँकिंगऐवजी मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून कर्ज घेणे पसंत करतात. यात मोठी संख्या इंदूर, जयपूर, सुरतसारख्या टिअर २ शहरातील युवकांची आहे.

{सर्व्हेत सहभागी ६०% क्रेडिट ग्राहकांनी एम्बेडेड फायनान्समध्ये रस दाखवला. त्यांचे म्हणने आहे की, यातून ई-कॉमर्सची शॉपिंग सहजपणे ईएमआयमध्ये बदलता येते. त्याची परतफेड करणे सोपे असते.

बातम्या आणखी आहेत...