आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टॅक्स टॉक:प्राप्तिकर वाचवण्यासाठी गुंतवणुकीस महिन्याचा अवधी, अशी करा तयारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 जूनपर्यंत गुंतवणुकीतून कराची रक्कम वाचवा
Advertisement
Advertisement

कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीमुळे वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०१९-२० च्या गुंतवणुकीसाठी शेवटची तारीख ३१मार्चवरून वाढून ३० जून केली होती. एखाद्या करदात्याने अद्याप कर बचतीसाठी गुंतवणूक केली नसेल तर अाताही त्यांच्याकडे महिन्याचा अवधी आहे. अशांनी ३० जून २०२० पर्यंतही गुंतवणूक केली तर त्यांना कर कपातीत किंवा सूट प्राप्त होऊ शकते. कोणत्या कलमात किती सूट मिळते आणि त्यासाठी कुठे गुंतवणूक करणे आवश्यक आहे याची माहिती जाणून घेऊ.

एखाद्या कर्मचाऱ्याचा ईपीएफ एप्रिल २०२० ते जून २०२० महिन्याच्या मध्यात कापला असेल तर त्या कर्मचाऱ्यास हवे असल्यास त्याची कपात वित्त वर्ष २०१९-२० च्या प्राप्तिकर रिटर्न भरतेवेळी घेऊ शकतो आणि पुढील वर्षी नव्या टॅक्स स्लॅबमध्ये कमी दराने कर देऊ शकतो. याच पद्धतीने ज्यांनी मुलांचे शालेय शुल्क ३० जूनआधी भरले असेल तर ते वित्त वर्ष २०१९-२० च्या करात त्याची सूट घेऊ शकतात. २०१९-२० मध्ये मालमत्ता विकली असेल तर भांडवली लाभ करातून वाचण्यासाठी टॅक्स सेव्हिंग बाँड ३१,मार्चआधी खरेदी केले होते तर अशा स्थितीत तुम्ही ३० जूनआधीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला भांडवली लाभ करात सूट मिळेल.वित्त वर्ष २०१८-१९ च्या रिटर्नला विलंब शुल्कासोबत प्राप्त करण्याची शेवटची तारीखही ३० जून केली आहे.

कलम ८०जी

यात अंतर्गत प्राप्तिकरात नोंदलेल्या संस्थांना दान दिल्यावर कर कपातीचा फायदा घेतला जाऊ शकता. उदाहरणार्थ, पंतप्रधान मदत निधीत कुणी दान दिल्यास त्याचा लाभ प्राप्तिकरात घेतला जाऊ शकतो.

कलम ८०डी

यात जीवन साथी किंवा मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यासाठी भरलेली जास्तीत जास्त २५ हजार रु.पर्यंत तसेच आई-वडिलांच्या आरोग्य विम्यावरील हप्त्यासाठीचे अतिरिक्त २५ हजारपर्यंत कपात मिळते.

कलम ८०सी

जास्तीत जास्त १.५ लाख रु. गुंतवणुकीतून करून उत्पन्नात कपातीचा दावा करू शकता. यामध्ये स्वत: जोडीदार किंवा मुलांचा जीवन विमा, पीएफ, युलिप,बँकेत टॅक्स सेव्हर एफडी, ईएलएसएस आदी येतात.

सीए : कीर्ती जोशी : पार्टनर, एचकेसी अँड कंपनी

Advertisement
0