आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Problems Persist After Unlock : Work Done By Only 20 25% Capacity In Textile Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:अनलॉकनंतरही अडचणींचा डोंगर कायम, टेक्स्टाइल उद्योगात अवघ्या 20-25% क्षमतेनेच काम

मंदार दवे, नरेंद्र जाट | अहमदाबाद, मुंबई, भिलवाडा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीडीपीमध्ये 15 ते 17% पर्यंत योगदान; या क्षेत्रात 4 ते 5 कोटी रोजगार

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आर्थिक गाडा हळूहळू पूर्वपदावर येत असताना देशात सर्वाधिक रोजगार देणारा टेक्स्टाइल उद्योग मात्र लॉकडाऊनच्या फटक्यानंतर अद्याप सावरलेला नाही. कोरोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव, घटलेली मागणी आणि मजूर परत न आल्याने बहुतांशी कपड्यांच्या मिल २० ते २५ टक्के क्षमतेने काम करत आहेत.

कपडा उत्पादनाच्या क्षेत्रात पहिल्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक आहे. त्यामुळे बहुतांशी मिलमधील कामावर परिणाम झाले आहे. या मिलमध्ये आठवड्यात ३ ते ४ दिवसच काम केले जात आहे. दुसरीकडे ज्या मिलमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आली तेथील काम बंद करण्यात येत आहे. टेक्स्टाइल उद्योगात गुजरात दुसऱ्या स्थानी आहे. येथे ३० हजार कोटींचा व्यवहार होतो. गुजरात गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे महासचिव अर्पण शाह म्हणाले की, कोरोना संकटामुळे मागील सहा महिन्यांपासून व्यवसायावर परिणाम झाला आहे. येथे संक्रमण अजून वाढतच आहे. अनलॉकमध्येही केवळ २० ते २५ टक्के काम सुरू झाले. मागील सहा महिन्यांमध्ये या सेक्टरला गुजरातमध्ये ८ ते १० हजार कोटींचा तोटा झाला आहे. राजस्थानमधील टेक्स्टाइल हब अशी ओळख असणाऱ्या भिलवाडाची स्थितीही वेगळी नाही. मेवाड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे महासचिव आर. के. जैन म्हणाले की, लॉकडाऊन संपल्यानंतरही टेक्स्टाइल उद्योग ४० टक्क्यांपर्यंत सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, आेडिशाला गलेले मजूर आतापर्यंत आलेले नाहीत. शर्टिंगसारख्या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवल्याने ४० टक्क्यांपर्यंत व्यवसाय सुरू आहे.

अनेक मॅन्युफॅक्चरिंग युनिटसमोर सध्या रोखीचे संकट

केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज घोषित केल्यानंतर याचा फायदा टेक्स्टाइल क्षेत्रात कमी प्रमाणात मिळाला. मोरटोरियमची सुविधा संपुष्टात आली असल्याने उद्योगासाठी कर्जाच्या ईएमआयचे ओझे वाढत आहे. अनेक मॅन्युफॅक्चरिंग युनिटना रोखीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

तीन महिन्यांत तेजीची आशा कमी

उद्योग तज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन महिन्या दरम्यान या क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागला. बहुतांशी लोक सण, समारंभ, लग्न या कार्यक्रमांसाठी कपड्यांची खरेदी करतात. परंतु कोरोनाच्या काळात अडचण उद्भवली असून मागणी वाढण्याची आशा कमी आहे. आणखी दोन ते तीन महिने कपड्यांच्या खरेदीत तेजी येण्याची आशा सध्यातरी खूप कमी दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...