आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Production Of Coffee Is Expected To Grow By 40 Per Cent This Year; News And Live Updates

अंदाज:कॉफीचा घोट झाला महाग; मागणी वाढली, पूर्ण जगात घटतेय उत्पादन; या वर्षी उत्पादन 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉफीचे जागतिक उत्पादन एका दशकाच्या नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता

अनेकांना हवाहवासा असणारा कॉफीचा घोट महाग होणार आहे. गेल्या ४-५ महिन्यांत याची किंमत १० टक्क्यांपर्यंत वाढली आहे आणि पुढे यामध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. मागणी वाढण्यासोबत उत्पादनातही मोठी घसरण आल्याने कॉफीच्या किमतीत सलग वाढ होत आहे. एडलव्हाइस वेल्थ रिसर्चच्या एका अहवालानुसार, कॉफी हंगाम २०२१-२२ मध्ये ३००-३३० बॅग (एका बॅगमध्ये ३० किलो) अरेबिका कॉफी आणि १४०-१६० लाख बॅग (एका बॅगेत ६० किलो) रोबस्टा कॉफीचे उत्पादन शक्य आहे. हे गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा ३५-४० टक्के कमी आहे. जगात कॉफीचे उत्पादन दशकाच्या नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे. जगात एकूण कॉफी उत्पादनाचा ७०% हिस्सा अरेबिका कॉफीचा असतो.

तेजीची शक्यता यामुळे

  • उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५-४०% घटून एका दशकाच्या नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे.
  • अमेरिकेत अनरोस्टेड कॉफी बीन्सच्या इन्व्हेंटरी २०१५ पासून आतापर्यंत सर्वात नीचांकी पातळीवर आली आहे.
  • आयात-निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरच्या कमतरतेमुळे समुद्रामार्गे मालपुरवठ्याचा खर्च १० वर्षांत उच्चांकी पातळीवर पाेहोचला आहे.

भारतात वापर वाढला
भारतात २०२० मध्ये प्रतिव्यक्ती वार्षिक सुमारे ९५ ग्रॅम कॉफीचा वापर होतो. याच्या तुलनेत २०१९ मध्ये प्रतिव्यक्ती ८५ ग्रॅम कॉफीचा वापर झाला होता. घटलेल्या आकड्यामागचे कारण म्हणजे सध्या कॉफीचा वापर केवळ शहरांत आहे.

देशात भाववाढ निश्चित
भारतात ५०% कॉफीची आयात ब्राझील आणि व्हिएतनामहून होते. तिथे भाव वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कॉफी महाग होणे निश्चित आहे. - पराग शहा, रिसर्च अॅनालिस्ट, एडलव्हाइस वेल्थ

66% कॉफी उत्पादन 3 देशांमध्ये

  • ब्राझील - 36%
  • व्हिएतनाम -20%
  • कोलंबिया - 10%

बातम्या आणखी आहेत...