आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विश्लेषण:ऑटो कंपन्या-बँकांचा नफा 61%पर्यंत वाढला, सिमेंट क्षेत्राचा 73% घटला

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तिमाहीत ऑटोमोबाइल, बँक व फायनान्स कंपन्यांचे उत्पन्न आणि नफा सर्वाधिक ६१% पर्यंत वाढला. विमा कंपन्यांचीही कामगिरी चांगली झाली. मात्र आयटी, एफएमसीजी कंपन्यांच्या नफ्यात किरकोळ वाढ झाली. सिमेंट, बांधकाम साहित्य कंपन्यांच्या उत्पन्न आणि नफ्यात ७३% पर्यंत घट झाली. दूरसंचार कंपन्यांचीही कामगिरी कमकुवत झाली. ७ नोव्हेंबरपर्यंत जुलै–सप्टेंबर तिमाहीसाठी निफ्टी ५० च्या ८५%पेक्षा जास्त कंपन्या आणि बीएसई ५००मध्ये सामिल ६०% कंपन्यांचे निकाल आले. कंपन्यांचे उत्पन्न व नफ्याच्या आकड्यातून संकेत मिळतात, व्यवसाय देशांतर्गत मागणीवर अवलंबून, त्यांची कामगिरी ज्यांचा व्यवसाय निर्यातीवर अवलंबून आहे त्यांच्यापेक्षा सरस ठरली.

बातम्या आणखी आहेत...