आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:चार वर्षे पिछाडीवर राहिल्यानंतर पीएसयू शेअर्सचा टॉप गिअर ; 1 वर्षात 49% परतावा, स्वस्तात मिळणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांना स्वारस्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परताव्याच्या बाबतीत जवळपास चार वर्षे पिछाडीवर राहिल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या (पीएसयू) समभागांनी पुन्हा टॉप गिअर टाकला आहे. यामुळे पीएसयूमध्ये गुंतवले जाणारे म्युच्युअल फंड आणि ईटीएफने गेल्या एका वर्षात शेअर बाजारातील सर्व प्रमुख निर्देशांकांना मागे टाकले आहे. गेल्या मार्चपर्यंत एका वर्षात पीएसयू फंडांनी सरासरी ३१ टक्के परतावा दिला आहे. सेन्सेक्स, बीएसई १०० आणि बीएसई ५०० यांनी केवळ १६-२० टक्के परतावा दिला आहे.

सीपीएसई (सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस) ईटीएफने गेल्या एका वर्षात सर्वाधिक ४९ टक्के परतावा दिला आहे. भारत ईटीएफने या कालावधीत ३४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आणि आदित्य बिर्ला सन लाइफ पीएसयू इक्विटी फंड जवळपास ३० टक्के परताव्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. त्या तुलनेत सेन्सेक्सचा परतावा १७ टक्क्यांपेक्षा कमी होता. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, पीएसयू समभागांचे खराब मूल्यांकन आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणांची मजबूत चिन्हे ही पीएसयू फंडांच्या उत्कृष्ट कामगिरीची दोन प्रमुख कारणे आहेत. स्वस्तात मिळाल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनीही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हे चक्र आताही सुरूच आहे. बीएसई पीएसयू निर्देशांकाने सुमारे १३ टक्के परतावा दिला आहे.

पीएसयू फंडांच्या चांगल्या कामगिरीची माेठी कारणे
1. २०१७ - २०२० दरम्यान, बीएसई पीएसयू निर्देशांक जवळपास ५० टक्क्यांनी घसरला होता.
2. सार्वजनिक बँकांची एनपीएची समस्या काही प्रमाणात दूर झाली.
3. तेजीत आकर्षक मूल्यांकनाचे शेअर्स वधारतात.
4. किरकोळ गुंतवणूकदारांची पीएसयू शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक केली.
5. सरकार कंपन्यांमधील भांडवली हिस्सा कमी करत आहेत, त्यामुळे भावना सुधारली आहे.

बँका चांगली कामगिरी करत राहतील
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, पीएसयू शेअर्स किंवा त्यात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांची कामगिरी या वर्षी घसरू शकते. पण बँका आणि एनबीएफसीच्या शेअर्सचा परतावा चांगला
असू शकतो.