आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PPF मधील गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती:जाणून घ्या- यात कशी करायची गुंवतणूक, कसा लाभदायी ठरेल 416 रुपयांचा फॉर्म्युला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज गुंतवणूकीचा सुरक्षित मार्ग सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि त्यावर मिळणारे व्याज देखील जास्त मिळेल. अशावेळी तुम्ही (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) योजनेची निवड करू शकता.

ही देशातील सर्वात लोकप्रिय स्मॉल सेव्हिंग योजना आहे. या योजनेत पैशांची गुंतवणूक करणाऱ्यांना अजिबात चिंता करण्याची गरज नाही. कारण या योजनेची हमी केंद्रसरकार घेते. विशेष म्हणजे या योजनेत नियमितपणे गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती देखील बनू शकता. त्यासाठी काही नियमांचे पालन तुम्हाला करावे लागणार आहे. चला तर जाणून घेऊया, या योजनेविषयी...

फक्त 500 रुपयांपासून करू शकता गुंतवणूक
PPF खात्यात मी सुरूवातीला अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करायला सुरूवात करू शकता. वर्षभरात तुम्ही कमाल दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पीपीएफ खात्यात तुम्ही एकाच वेळी दीड लाखांपर्यंत रक्कम भरू शकता. किंवा हप्तानुसार देखील तुम्ही गुंतवणूकीची रक्कम खात्यात जमा करू शकता. विशेष म्हणजे या खात्यातील रक्कमेवर कोणताही कर लागत नाही. त्यामुळे नोकरदार वर्गांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे.

15 वर्षांची मॅच्युरिटी

पीपीएफमधील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम, तिन्ही पूर्णपणे करमुक्त आहेत. पीपीएफमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला मॅच्युरिटीनंतरही चालू ठेवायचे असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खाते 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी PPF एक्स्टेंशनसाठी अर्ज करावा लागतो. 15 वर्षांच्या मॅच्युरिटीसह या योजनेसह, तुम्ही इर्मजन्सीला 50% रक्कम काढू शकता. मात्र यासाठी गुंतवणुकीचा कालावधी 6 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.

खाते कसे उघडणार, किती मिळते व्याजदर
पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिससह देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तुम्ही अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकता, परंतु यासाठी पालक असणे अनिवार्य आहे. मुलाच्या खात्यातील कमाई पालकांच्या उत्पन्नात जोडली जाते. PPF वर सध्याचा व्याजदर 7.1 टक्के आहे.

PPF मधून असे बनू शकता करोडपती
पीपीएफ खाते तीन वर्षे नियमित चालवल्यानंतर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. खाते उघडण्याच्या तिसऱ्या वर्षापासून ते सहाव्या वर्षापर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या सरकारी सुरक्षित योजनेत थोडे पैसे जमा करून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी अगदी साधे सूत्र आहे. दररोज फक्त 416 रुपये जोडून म्हणजे वार्षिक 1.5 लाख रुपये, तुम्ही सध्याच्या 7.1% व्याजदराच्या आधारे 25 वर्षांत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करू शकता.

हे देखील वाचा

तुमचे पॅन कार्ड हरवले, अजिबात चिंता करू नका : घरबसल्या काढू शकता पॅन कार्ड

अशातच जर तुमचे पॅन कार्ड गहाळ झाले तर तुम्ही अडचणीत येवू शकता, अशावेळी तुम्ही पॅन कार्ड कसे मिळविणार? आता काय करावे, असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण चिंता करू नका. तुम्हाला ऑनलाईन ई-पॅन काढता येणार आहे, ते म्हणजे घरबसल्या देखील. - येथे संपूर्ण बातमी वाचा

NPS खाते काय असते, कशी बचत करणार:वाचा- राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बचतीचे फायदे

सेवानिवृत्ती नंतरच्या आर्थिक समस्या उद्भवू नये म्हणून बहुतांश लोक नोकरीत असताना आर्थिक नियोजन सुरू करतात. यासाठी ते एफडी, आरडी, म्युच्युअल फंडासारखे पर्याय निवडतात. भारतात शासकीय नोकरदारांना पेन्शनचा लाभ मिळतो. पण खासगी नोकरदार वर्गाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खासगी नोकरदार बचत, गुंतवणुकीवर भर देत आर्थिक बाजू पक्की करण्याचा प्रयत्न करतात. येथे वाचा संपूर्ण बातमी

नोकरी सोडली आता ग्रॅच्युइटीची रक्कम हवी : जाणून घ्या - ग्रॅच्युइटी मिळविण्याची प्रक्रिया

शासकीय नोकरी असो किंवा खासगी कंपनीतील कर्मचारी त्यांना ग्रॅच्युइटीच्या कायद्यातंर्गत ठराविक कालावधीपर्यंत एकाच संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम केल्यावर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळतो. जेव्हा एखादा कर्मचारी सलग 5 वर्षं एखाद्या कंपनीसोबत काम करतो, तेव्हा त्याला ग्रॅच्युइटीच्या ठरलेल्या नियमानुसार त्याची रक्कम दिली जाते. एखादा कर्मचारी निवृत्त होत असेल किंवा त्याने नोकरीचा राजीनामा दिला, तरीही त्याला ग्रॅच्युइटी दिली जाते. येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...