आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा रब्बी पीक जोरदार साधण्याची शक्यता आहे. कडधान्याचे उत्पादन सर्वाधिक वाढू शकते. आतापर्यंतच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार, देशात कृषी क्षेत्रावर कोविड महारोगराईच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम झाला नसल्याचे दिसते. कृषी मंत्रालयानुसार, ७ मेपर्यंत रब्बी पिकांचा पेरा २१.५८% वाढून ८०.०२ लाख हेक्टर झाला आहे. गेल्या हंगामात या तारखेपर्यंत ६५.८२ लाख हेक्टरमध्ये रब्बी पिकांची पेरणी झाली होती. कडधान्ये, तेलबिया, भरडधान्य आणि धान, सर्व पिकांची पेरणी वाढली आहे. मात्र,कडधान्याचे क्षेत्र सर्वाधिक ६९.२२% वाढून १७.७५ लाख हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी ७ मेपर्यंत १०.४९ लाख हेक्टरमध्ये कडधान्याचा पेरा झाला होता.
यादरम्यान मुगाची पेरणी ८.२९ लाख हेक्टरवरून वाढून १४.४२ हेक्टर आणि उडदाचे क्षेत्र १.९५ लाख हेक्टरवरून वाढून २.९४ लाख हेक्टर झाले आहे. आतापर्यंत १०.७४ लाख हेक्टरमध्ये तेलबियांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या अवधीपर्यंत ९.५८ लाख हेक्टरमध्ये तेलबियांची पेरणी झाली होती. याच पद्धतीने आतापर्यंत तेलबियांचे क्षेत्र १२.०५% वाढले आहे. धानाचे क्षेत्र १५.५२% वाढून ३९.४३ लाख हेक्टर झाले. गेल्या वर्षी या अवधीत ३४.१३ हेक्टर होती. भरडधान्याचे क्षेत्र ११.६२ लाख हेक्टरवरून १२.११ लाख हेटर झाले आहे.
७ मे २०२१ पर्यंत पेरणीची स्थिती
पीक 2021 2020 वृद्धी/घसरण
धान 39.43 34.13 15.52%
कडधान्ये 17.75 10.49 69.22%
मूग 14.42 8.29 74.03%
उडीद 2.94 1.95 50.95%
अन्य कडधान्ये 0.39 0.25 52.44%
भरडधान्य 12.11 11.62 4.22%
तेलबिया 10.72 9.58 12.05%
भुईमूग 5.87 5.23 12.33%
सूर्यफूल 0.52 0.51 2.98%
(आकडे लाख हेक्टरमध्ये. स्रोत : कृषी मंत्रालय)
भावावर दबाव राहील
अातापर्यंतच्या आकडेवारीनुसार मूग आणि उडदासारख्या डाळींच्या भावात घसरण येण्याची शक्यता आहे. यापुढे वातावरणाने साथ दिल्यास कडधान्याचे भाव कमी हाेतील. -सुजय काबरा, दाल मिलर
मात्र, पाऊस २८% कमी झाला
रब्बी हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा २८% कमी पाऊस झाला आहे. एक मार्चपासून ६ मेदरम्यान देशात ५७.५ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला. या अवधीत सरासरी ७९.८ मिलिमीटर पाऊस होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.