आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Pulses Became Cheaper By 20 Per Cent In One Month Due To Open Imports; News And Live Updates

कमोडिटी रिपोर्ट:आयात खुली झाल्याने एका महिन्यात डाळी झाल्या 20 टक्क्यांनी स्वस्त; खाद्यतेलांच्या किमती घटल्यावर आता डाळींनी दिला दिलासा

नवी दिल्ली, भोपाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरवठ्यात वाढ, मागणीत घट; हाच कल राहिला तर घसरण राहणार कायम

देशातील खाद्यतेलांनंतर अाता डाळींच्या भावातही घसरणीचा कल दिसून येत अाहे. गेल्या १५ मे राेजी अायात खुली झाल्यानंतर अातापर्यंत डाळीच्या किमतींमध्ये २० टक्क्यांनी घट झाली अाहे. सध्या मागणी कमी असल्यामुळे डाळीतील ही घसरण यापुढेही कायम राहण्याची शक्यता अाहे. अायात खुली झाल्यानंतर पुरवठ्यात वाढ झाली अाहे. परिणामी गेल्या २० दिवसांत मूग डाळीच्या भावात सगळ्यात जास्त १५ ते २० टक्के घट झाली अाहे. याच काळात तूर अाणि उडीद डाळींच्या भावातही १५ टक्क्यांनी घट झाली अाहे.

चणा डाळही १० टक्क्यांनी स्वस्त झाली अाहे. दाल मिलचे सुजय काबरा यांच्या म्हणण्यानुसार देशाच्या प्रत्येक भागात काेविड-१९ साठी असलेले निर्बंध पूर्णत: हटवण्यापर्यंत कमी मागणीचा कल असेल. पण या काळात भाववाढ हाेण्याची शक्यता नाही. पण नंतर कल बदलू शकताे. परंतु त्याची शक्यता कमी अाहे. कारण, या वर्षाच्या मेपर्यंत डाळ लागवडीखालील क्षेत्रफळ ६९ टक्क्यांनी वाढले अाहे. त्यामुळे उत्पादनात माेठ्या प्रमाणावर वाढ हाेण्याची शक्यता अाहे.

देशातील डाळींच्या वार्षिक खपाच्या तुलनेत जवळपास निम्मी डाळ आयात करावी लागते. त्यामुळेच अायात सुरू झाल्यानंतर अाता डाळीचे दर कमी हाेऊ लागले अाहेत. ऑल इंडिया दाल मिलर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल म्हणाले की, डाळींचे दर काही महिन्यांपर्यंत स्थिर राहू शकतात. मान्सून व नवीन पिकाबाबत परिस्थिती स्पष्ट झाल्यावर कल बदलू शकताे. भाव वाढलेले नसल्याने व मागणी कमी असल्याने सध्या सरकारने अायात खुली करण्याची गरज नव्हती.

मूग, उडीद, चणा एमएसपीच्या खाली
सर्वसामान्यांसाठी डाळीचे भाव घसरणे चांगली बातमी असली तरी शेतकऱ्यांना मात्र नुकसान हाेईल. कारण मूग, उडीद अाणि चण्याचे भाव किमान अाधारभूत किमतीच्या (एमएसपी) खाली अाले अाहेत.

डाळ लागवडीखालील क्षेत्रफळात ६९% वाढ
कृषी मंत्रालयानुसार यंदा मेपर्यंत डाळ लागवडीखालील क्षेत्र ६९ टक्क्यांनी वाढून १७.७५ लाख हेक्टरवर गेले. गेल्या वर्षी मेपर्यंत १०.४९ लाख हेक्टरमध्ये डाळीची लागवड झाली हाेती. या काळात मूग लागवडीखालील क्षेत्र १४.४२ हेक्टरवर गेले.

आयात अाताच खुली करण्याची गरज नव्हती
अायात खुली करण्याइतपत डाळींचे भाव गेल्या काही महिन्यांत वाढलेले नव्हते. अाता डाळींचे दर अशा पातळीवर अाहेत की त्यात घसरण हाेण्याची शक्यता नाही. - सुरेश अग्रवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया दाल मिलर्स असाेसिएशन

२० दिवसांत १२ रुपये/ किलाेपर्यंत भाव घटले
डाळी घसरण टक्के
मूग 22-30 15-20%
उडीद 10-15 10-15%
तूर 15-22 10-15%
चणा 5-8 6-10%
घसरणीचे आकडे रुपयांमध्ये.

बातम्या आणखी आहेत...