आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब नॅशनल बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. आता 10 लाखांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याजदर 2.75% वरून 2.70% पर्यंत कमी केले आहेत. दुसरीकडे,10 लाख ते 500 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेवर 2.75% वार्षिक व्याज मिळेल. त्यातही 0.05% कपात करण्यात आली आहे. तसेच नवीन दर 4 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आले आहे.
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा व्याजदर कपात
बँकेने यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये व्याजदरात कपात करण्यात आली होती आणि आता बँकेने व्याजदरत कपात करण्याची ही दुसरी वेळ असुन, फेब्रुवारीमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या खात्यांसाठी 2.75% व्याजदर होता. त्याच वेळी, 10 लाख रुपयांपासून ते 500 रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांसाठी वार्षिक 2.80% दराने व्याज दिले जात होते. या दोन्ही खात्यांवर 0.05% व्याजदर कपात केली आहे.
PNB ने 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह वेतन प्रणाली लागू केली आहे. पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिलपासून चेक पेमेंटसाठी पडताळणी आवश्यक असेल असे सांगण्यात आले होते. चेक पेमेंट सुरक्षित करण्यासाठी आणि बँक फसवणूक टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
जर ग्राहकांनी बँकेच्या शाखेतून किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख आणि त्याहून अधिक रकमेचे चेक जारी केले तर वेतन प्रणाली पुष्टीकरण अनिवार्य असेल. ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक अल्फा, चेक तारीख, चेक वरील रक्कम आणि लाभार्थीचे नाव देणे अनिर्वाय असेल
बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावरही आता भरावा लागेल टॅक्स
आयकर कायद्याच्या कलम 80 TTA अंतर्गत, बँक/सहकारी सोसायटी/पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याच्या बाबतीत व्याजातून वार्षिक 10,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. हा लाभ 60 वर्षांखालील व्यक्ती किंवा HUF(संयुक्त हिंदू कुटुंब) साठी उपलब्ध असेल. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट 50 हजार रुपये आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास टीडीएस कापला जाईल असे सांगितले गेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.