आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Quarterly Financial Performance Of IT Companies Strong; Infosys Wipro Results Better, Profit Rises 20%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नववर्षाचा शुभारंभ:आयटी कंपन्यांची तिमाही वित्तीय कामगिरी जोरदार; इन्फोसिस-विप्रोचे निकाल चांगले, 20 टक्क्यांपर्यंत वाढला नफा

बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इन्फोसिसचा नफा 16.6 टक्के वाढून 5,197 कोटी रुपयांवर

देशातील आयटी कंपन्यांची चांगली वित्तीय कामगिरी सुरू आहे. टीसीएसनंतर देशातील दोन मोठ्या कंपन्या इन्फोसिस आणि विप्रोनेही अपेक्षेपेक्षा चांगले वित्तीय निकाल दिले आहेत. इन्फोसिसचा डिसेंबर तिमाहीचा नफा १६.६ टक्के वाढून ५,१९७ कोटी रु. झाला. वर्षभरापूर्वी समान अवधीत कंपनीचा नफा ४,४५७ कोटी रु. होता. दुसरीकडे, विप्रोचा डिसेंबर तिमाही नफा २०.८% वाढून २,९६८ कोटी रुपयांवर पोहोचला.

इन्फोसिसने बुधवारी एका नियामकीय विवरणात नमूद केले की, डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न (महसूल) वाढून १२.३ ने वाढून २५,९२७ कोटी रुपयांवर पोहोचले. हा वर्षभरापूर्वी समान तिमाहीत २३,०९२ कोटी रु. होता. यासोबत इन्फोसिसने वित्त वर्ष २०२०-२१ साठी आपल्या उत्पन्नाच्या अंदाजास (रेव्हेन्यू गायडन्स) वाढवून ४.५ ते ५% केले आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये कंपनीने याच्या २-३%चा रेव्हेन्यू गायडन्स दिला होता. कंपनीचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले, इन्फोसिसने अाणखी एका तिमाहीत चांगले वित्तीय निकाल सादर केले आहेत.

विप्रोकडून १ % अंतरिम लाभांश देण्याची घोषणा

देशातील चौथी मोठी आयटी कंपनी विप्रोचा डिसेंबर तिमाहीत एकत्रित नफा २०.८ टक्के वाढून २,९६८ कोटी झाला अाहे. वर्षभरापूर्वी समान तिमाहीत हा २,४५५.९ कोटी रुपये होता. शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीत कंपनीने ही माहिती बुधवारी दिली. तिमाहीदरम्यान कंपनीचा कामकाज खर्च १.३ टक्के वाढून १५,६७० कोटी रु. होते. यासोबत कंपनीने शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर एक रु. अंतरिक लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ आणि एमडी थिएरी डेलापोर्टे म्हणाले, ऑर्डर बुकिंग, महसूल आणि नफ्यात सलग दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी झाली आहे.

आयटी कंपन्यांची कामगिरी का महत्त्वाची आहे?

> जीडीपीत आयटी सर्व्हिसेसचा हिस्सा १० %आहे. ही निम्मी हिस्सेदारी ठेवणाऱ्या ऑटोमोबाइलपेक्षा (८%) जास्त आहे.

> देशाच्या आयटी क्षेत्रात गेल्या २० वर्षांत ३.२५ लाख कोटींपेक्षा जास्त प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे.

> हे क्षेत्र ४० लाख लोकांना उच्च उत्पन्नाचा रोजगारदेते, टीसीएसमध्ये ४ लाख, इन्फोसिसमध्ये २ लाखांवर कार्यरत.

> आयटी क्षेत्राचा वार्षिक महसूल १४ लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. यामध्ये मोठा हिस्सा विदेशी चलनाच्या रूपात येतो.

बातम्या आणखी आहेत...