आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Queen Elizabeth II Is Car Lover I Bentley State Limousine To A Rolls Royce I Didn't Even Need A License To Drive

महाराणी एलिझाबेथ II यांना पासपोर्ट, लायसन्सची नव्हती गरज:शानदार अन् महागड्या गाड्यांचे होते कलेक्शन, नवीन राजालाही असेल का हा नियम

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. 21 एप्रिल 1926 रोजी जन्म झालेल्या राणी यांनी 6 फेब्रुवारी 1952 रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या निधनानंतर ब्रिटनची सत्ता हाती घेतली.त्यावेळी त्या केवळ 25 वर्षांच्या होत्या. तर तब्बल 70 त्यांनी राज्य केले. महाराणी यांनी त्यांच्या कारकिर्दीत कस्टम बेंटली ते व्हिंटेज रोल्स-रॉयसेस पर्यंतच्या कारमध्ये दिसून आल्या.

त्यांच्या रॉयल कार कलेक्शनमध्ये अतिशय आकर्षक व महागड्या कारचा समावेश होता. त्या बऱ्याचदा स्वतः अनेक कार चालवित असत. विशेष बाब म्हणजे त्यांना कार चालविण्यासाठी कोणत्याही लायसन्सची गरज नव्हती. आज त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच त्यांच्यानंतर गादीवर येणारे राजा चार्ल्स तृतीय यांना देखील कारच चालविण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज लागणार नाही का? त्यांच्यासाठी देखील हा नियम राहणार आहे. का याबद्दल जाणून घेऊ.

महाराणी एलिझाबेथ II यांचा रूबाब, विना पासपोर्ट घुमल्या शंभरपेक्षा जास्त देश

जेव्हा तुम्हाला आपल्या देशातून दुसऱ्या देशात जायचे असेल तर तुम्हाला पासपोर्ट गरजेचा असतो. यासाठी दुसऱ्या देशाचा व्हिजा आणि पासपोर्ट असणे गरजेचे आहे. तसा प्रवास तुम्ही करूच शकत नाही. अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, यात एक गोष्ट विशेष आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या एकमेव अशा महिला होत्या. त्यांना विजा आणि पासपोर्टची गरज नव्हती. त्या कोणत्याही देशात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही देशात प्रवास करू शकत होत्या. त्यांना कोणत्याही परवानगीची गरज नव्हती. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे शंभरपेक्षा जास्त देशात प्रवास केला आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना पासपोर्टची गरज नव्हती. कारण त्यांच्याकडे विशेष गोपनीय कागदपत्रे होते. महाराणी यांचे विदेशीदूत या कागदपत्रांना पोहचविणारे प्रभावी माध्यम होते. ही कागदपत्रे म्हणजे एक प्रकारचे पासपोर्टसारखे प्रमाणित मानले जात होते.

राजघराण्यातील अन्य सदस्यांकडे आहे पासपोर्ट

मुळात ब्रिटीश राजघराण्यातील महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना सोडून अन्य सदस्यांकडे विदेश दौऱ्यासाठी पासपोर्टची गरज आहे. मात्र, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना विदेश दौऱ्यासाठी पासपोर्टची गरज नव्हती. अर्थात ही सुविधा फक्त त्यांच्यासाठी असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांकडे पासपोर्ट सुविधा आहे. दरम्यान, ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीला सर्वाधिकार असता. त्यामुळे गादीवर बसणाऱ्या नवीन राजाला देखील विना पासपोर्ट प्रवास आणि लायसन्सविना वाहने चालविता येतील. असे एकंदरीत हा नियम असतो.

महाराणी एलिझाबेथ यांच्या संग्रहातील कारची माहिती घेऊया

  • 1. बेंटले स्टेट लिमोझिन

राणी एलिझाबेथ द्वितीय अनेकदा बेंटले स्टेट लिमोझिन या कारमध्ये प्रवास करताना दिसून आल्या. बेंटले कंपनीने या कारचे फक्त दोनच युनिट बनवले होते. ही कार राणी यांना सिंहासनावर बसवण्याची पहिली पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीकडून भेट देण्यात आली होती. या शक्तिशाली कारची किंमत सुमारे 10 दशलक्ष ब्रिटिश पौंड आहे. हे 6.75-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनद्वारे समर्थित कार होती.

स्टेट लिमोझिन कारचे बॉडीवर्क आणि काचेचे काम अतिशय मजबूत करण्यात आलेले होते. या कारची केबिन बॉम्बस्फोटापासून प्रतिरोधक करणारी होती. गॅस किंवा रासायनिक हल्ल्याला रोखण्यासाठी ही कार समर्थ होती. आणीबाणीच्या काळात वेगाने गाडी चालवता यावी अशा पद्धतीने या कारच्या टायर्सची रचना करण्यात आलेली होती. राणीच्या समान उंचीचे मॉडेल वापरुन कारच्या मागील सीटची स्थिती निश्चित केली गेली होती.

कारच्या मागच्या सीटवर ब्रिटीश कापड उत्पादक हेल्ड ब्रदर्सने बनवलेले लॅम्बवूल कापड बसविण्यात आलेले होते. मागील गालीचा फिकट निळ्या रंगात असून पुढील बाजूस गडद निळ्या रंगाचा कार्पेट बसवण्यात आलेला होता. बेंटले लिमोझिन कार बहुदा अधिकृत कार्यक्रमांसाठी वापरली जात असे. तर महाराणी एलिझाबेथ या कधीकधी स्वतःच ही कार चालवित असत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या देशातील एकमेव अशा व्यक्ती होत्या, ज्यांना गाडी चालवण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नव्हती.

बेंटले स्टेट लिमोझिनजवळ उभ्या असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय.
बेंटले स्टेट लिमोझिनजवळ उभ्या असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय.

2. लँड रोव्हर
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मालकीची 30 लँड रोव्हर होती. त्याची आवडती कार मूळ लँड रोव्हर होती (नंतर फक्त डिफेंडर म्हणून ओळखली जाते). याशिवाय 2015 मध्ये लँड रोव्हरने राणीला स्टेट रिव्ह्यू नावाची इलेक्ट्रिक हायब्रीड कार सादर केली. त्यात मोकळे छत आणि चमकदार मरून रंगसंगती होती. ही लांब-व्हीलबेस SUV कार्डिफमधील रॉयल वेल्श रेजिमेंटमध्ये पदार्पण झाली. त्याच्याकडे रेंज रोव्हर LWB Landaulet देखील होती.

राणी एलिझाबेथ द्वितीयला लँड रोव्हरचे खुले छत आणि चमकदार मरून रंगसंगती होती.
राणी एलिझाबेथ द्वितीयला लँड रोव्हरचे खुले छत आणि चमकदार मरून रंगसंगती होती.

3. रोल्स रॉइस
बेंटले, लँड रोव्हर्स आणि रेंज रोव्हर्स व्यतिरिक्त, त्याच्याकडे रोल्स-रॉयसचे काही मॉडेल देखील होते. राणी यांनी वापरलेल्या इतर वैयक्तिक वाहनांमध्ये जग्वार एक्स-टाइप इस्टेट आणि डेमलर व्ही 8 सुपर एलडब्ल्यूबी, रोव्हर पी5बी आणि व्हॉक्सहॉल क्रेस्टा इस्टेट, बेंटायगा या कारचा समावेश होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा आणि माजी प्रिन्स ऑफ वेल्स जे आता राजा चार्ल्स तृतीय झाले आहेत.

राणी एलिझाबेथ द्वितीय रोल्स रॉयस कारमध्ये दिसत आहेत.
राणी एलिझाबेथ द्वितीय रोल्स रॉयस कारमध्ये दिसत आहेत.

महाराणींच्या कार संग्रहातील काही छायाचित्रे

हा फोटो आहे बेंटले स्टेट लिमोझिनचा. बेंटलेने ही कार खास महाराणीसाठी बनवली होती.
हा फोटो आहे बेंटले स्टेट लिमोझिनचा. बेंटलेने ही कार खास महाराणीसाठी बनवली होती.
बातम्या आणखी आहेत...