आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्विंटिलियन बिझनेस मीडिया समुहाने बीक्यू प्राइम हिंदी वेबसाइट लाँच केली आहे. बीक्यू प्राइम आधी ब्लूमबर्ग क्विंट नावाने ओळखली जायची. आता ते हिंदी वेबसाइटच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि बाजाराशी संबंधित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतील. एएमजी मीडियाचे सीईओ आणि बीक्यू प्राइमचे संचालक संजय पुगलिया यांनी विश्वास व्यक्त केला की, बीक्यू प्राइमप्रमाणेच बीक्यू प्राइम हिंदीही वाचकांच्या मनात स्थान मिळवेल. ते म्हणाले, वाचक आणि दर्शकांप्रती जबाबदारी आमचे मूलभूत तत्व आहे.
बीक्यू प्राइमचे सीईओ अनिल उनियाल यांनी सांगितले, बीक्यू प्राइम तरूणांकडून चालवली जाईल. त्यातील बहुतांशी पत्रकार तरूण आहेत. त्यातील मजकूर लोकांचे उत्पन्न वाढीचे पर्याय सांगेल. हिंदी मीडियात सध्या अशा मजकुराची कमतरता आहे. बीक्यू प्राइम हिंदीचे लक्ष लोकांची वैयक्तिक अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. त्यात राजकारण, आरोग्य आणि समाज कल्याणाशी संबंधित बातम्याही असतील. त्यांनी असेही सांगितले की, ही वेबसाइट फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध असेल. यामुळे वाचकांची सोय होईल. त्यांना अनेक प्लॅटफॉर्मवरून बीक्यू प्राइम हिंदी वेबसाइट अॅक्सेस करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.