आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Quit His Job And Started Farming; Earnings Of Rs 15 Lakh Per Annum By Selling Masala Gud, Candy And Tea

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजची पॉझिटिव्ह स्टोरी:नोकरी सोडून सुरू केली शेती; मसाला गुड, कँडी आणि चहा विकून वर्षाला 15 लाखांची कमाई

इंद्रभूषण मिश्र14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या पॉझिटिव्ह स्टोरीमध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या सचिन तानाजी येवले आणि त्यांच्या पत्नी वर्षा सचिन येवले यांची. दोन्ही सुशिक्षित असून सचिनने गेली कित्येक वर्षे मल्टीनॅशनल कंपनीत काम केले आहे. परंतु, तो आता आपल्या पत्नीसोबत अडीच एकरात सेंद्रीय आणि नाविण्यपूर्ण शेती करतो आणि त्यातून ऊस, फळे आणि भाजीपालांचे उत्पादन घेतो. याबरोबरच ते सेंद्रिय गूळ, मसाला गूळ, गूळ साखर, लॉलीपॉप आणि कँडी आदी उत्पादनातून दरवर्षी 15 लाख रुपये कमवत आहे.

33 वर्षांच्या सचिनने 'अॅग्रीबिझिनेस मॅनेजमेंट' मध्ये पीजी डिप्लोमा केला असून त्याची पत्नी वर्षा हिने बीएससी अॅग्रीकल्चरमध्ये शिक्षण घेतले आहे. सचिन सांगतो की, "नोकरीच्या वेळेस मी हमेशा हा विचार करत होतो की, शिक्षणातून मी जे काही शिकलो आहे. त्याशिक्षाणाचा उपयोग इथे कुठेच करता येत नव्हता. मला शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करता येत नसून, त्यामुळे, मी 2013 ला नोकरी सोडून शेती करण्याचे ठरविले."

लोकांच्या भेटी-गाठींसह ऑनलाईन माहिती गोळा करत होतो

सचिन सांगतो की, ज्यावेळी मी सेंद्रीय शेती करायला सुरुवात केली, त्यावेळेस सुरुवातीला चांगले उत्पादन झाले नाही. चांगली नोकरी सोडून शेती केली तेव्हा गावातील काही लोकांनी माझी थट्टा उडवली. शेतीत कुठे नफा मिळणार, असे टोमणे मारायला सुरुवात केली. परंतु, या सर्व परिस्थितीत माझी पत्नी वर्षा ही कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. लोकांच्या टोमण्यांवर लक्ष न देता सतत कष्ट करत राहिलो.

सचिन ज्या भागातून येतो, तेथे मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. सचिन सांगतो की, आमच्या कुंटुबाने यापूर्वीही पारंपारिक शेती केली होती. परंतु, त्यात चांगल्या नफा मिळत नव्हता. मी ज्यावेळेस शेती करायला गावाकडे आलो, सुरुवातीला प्रोग्रेसिव्ह शेतकऱ्यांच्या भेटी घेत माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने नवीन शेतीची माहिती जोडली. दरम्यान, ऊसाच्या उत्पादन व्यवसायात चांगला स्कोप आहे हे मला कळाले.

ऊसाच्या शेतीसोबतच भाजीपालाची लागवड

चीनने आपल्या जमिनीला वेगवेगळ्या भागात विभागून घेतले आहे. ते जूनमध्ये उस लागवड करत असून सोबतच भुईमुंग, डाळी आणि भाजीपालाही घेतात. एका भागात त्यांनी पेरूची बागसुद्धा लावली. सचिनने सांगितल्याप्रमाणे, ज्यावेळी जो सीझन असतो, आम्ही त्यानुसार उत्पादन घेतो. ऊसाच्या मोसमात आम्ही ऊस विकत असून सिझन संपले की आम्ही प्रोसेसिंगवर लक्ष केंद्रीत करतो. सेंद्रीय गूळ, लॉलीपॉप आणि कँडी ही आमची ओळख असून लोक मोठ्या प्रमाणावर मागणी करतात.

गुळाच्या चहाला एवढे महत्व का?

सचिनची पत्नी वर्षा ही शेतीच्या कामात आपल्या पतीला मदत करत दुकान सांभाळते. त्यांनी शेतीच्या जवळच एक स्टॉल उभारले असून त्यात ते आपले प्रॉडक्ट आणि भाजीपाला विकतात. तसेच, आताच त्यांनी गुळापासून तयार होणारा खास चहा विकायला सुरुवात केली. हे बनवायला चहा पत्ती, साखर किंवा दुधाची गरज नसते. ते गुळासोबत लेमनग्रास, इलायची आणि अद्रक इत्यादी वापरून चहा तयार करतात. गुळाचा केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही फायद्याचा आहे. गुळाच्या चहाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बरेच लोक या जोडप्याला रेसिपीबद्दल विचारणा करतात. लवकरच आपण हे मार्केटमध्ये आणू असे येवलेंनी सांगितले.

मार्केटिंगसाठी काय केले?

सचिन सांगतो की, आपल्या उत्पादनाला बाजारात चांगल्या दरात विकणे सोपीसाधी गोष्ट नाही. सुरुवातीच्या काळात आम्ही फळे आणि भाजीपाला शेतातून काढल्यानंतर एका बकेटीत घेत रस्त्याच्या कडेला बसून लोकांना विकायचो. नंतर मी शहरात जाऊन वेगवेगळ्या लोकांजवळ आपले प्रॉडक्ट विकण्यास सुरुवात केली. मी सांगायचो की, तुम्ही एकदा ट्राय करा आवडल्यास ऑर्डर द्या. असे करता-करता ऑर्डर वाढत गेल्या. आता आमच्या व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये 100 वर लोक असून त्यांना काही गरज असल्यास आम्हाला मेसेज करून मागणी करतात.

बातम्या आणखी आहेत...