आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Rahul gandhi discuss with mr rajiv bajaj md bajaj auto on impact of lockdown indian economy

कोरोनावर चर्चा :विकसित देशांतील श्रीमंतांनाही फटका बसल्याने कोरोनाने खळबळ माजली; राहुल गांधींची चर्चा करताना बजाज ऑटोच्या एमडींचे मत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपण खुलासा, तर्क आणि सत्यतेच्या बाबतीत कुठे तरी मागे पडलो -राजीव बजाज
  • इतर कुठल्याही देशांच्या तुलनेत भारतातील लॉकडाउन सर्वात कठोर होता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनावर चर्चा सिरीज अंतर्गत गुरुवारी बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) राजीव बजाज यांच्याशी बातचीत केली. यामध्ये बजाज यांनी सांगितले, "कोरोनाचा फटका विकसित देश आणि श्रीमंत लोकांना देखील बसला. त्यामुळेच कोरोनाने जगभरात खळबळ उडाली. लोकांचे असेही म्हणणे आहे की टीबी, न्युमोनिया आणि डायरिया सारख्या रोगांमुळे भारतात लाखो मुलांचा मृत्यू होतो. परंतु, कोरोनाचा सर्वात वाइट परिणाम विकसित देशांना देखील सहन करावा लागला आहे." जेव्हा श्रीमंत आणि उच्चभ्रू घरातील लोकांना फटका बसतो तेव्हा नेहमीच हेडलाइन केल्या जातात. त्यांची सर्वत्र चर्चा केली जाते. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा कुणी तरी म्हटले होते की आफ्रिकेत रोज 8 हजार मुले भुकेने मृत्यूमुखी पडतात. पण, याची परवा कुणाला आहे? अशी आठवणही बजाज यांनी करून दिली.


इतर देशांच्या तुलनेत भारतातील लॉकडाउन सर्वात कठोर

बजाज यांच्या मते, इतर देशांच्या तुलनेत भारतातील लॉकडाउन हे सर्वात कठोर होते. इतर देशांत अशी सक्ती मी पाहिलेली नाही. जगभरातील माझे मित्र सुद्धा घरातून बाहेर पडण्यासाठी मुक्त होते. एका पोलिस अधिकाऱ्याशी मी चर्चा केली. तेव्हा हेलमेट नाही घालणाऱ्या 99.9 टक्के लोकांवर कारवाई होत नाही. पण, लॉकडाउनमध्ये मास्क न घालणाऱ्या आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्या सर्वांना फटके देण्यात आले असे ते पोलिस म्हणाले.


'खुलासा करण्याच्या बाबतीत आपण मागे पडलो'

आपण इटली, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम सारख्या देशांना फॉलो केले. पण, त्यानुसार बेंचमार्क ठरवले नाहीत. त्या देशातील आजार, तापमान, लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती आपल्या देशापेक्षा वेगळी आहे. कुणीच हे सांगायला तयार नव्हते की आपल्या देशात किती लोकांपुढे संकट आहे. नारायण मूर्ती नेमीच सांगतात, की संशय असल्यास खुलासा करायला हवा. परंतु, आपण खुलासा, तर्क आणि सत्यतेच्या बाबतीत कुठे तरी मागे पडलो.

0