आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Food Will Be Delivered Directly To Your Seat With The Help Of PNR Number, Know The Order Process

व्हॉट्सअ‌पद्वारे करू शकतात जेवनाची ऑर्डर:रेल्वे प्रवाशांसाठी सेवा; PNR नंबरच्या मदतीने जेवन थेट सीटवर, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आता प्रवासादरम्यान रेल्वेतील प्रवासी व्हॉट्सअ‌ॅपद्वारे जेवण ऑर्डर करू शकणार आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) अन्न वितरण सेवा Zoop ने Jio Haptic च्या सहकार्याने ही सुविधा सुरू केली आहे. सध्या शंभर हून अधिक रेल्वे स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

ऑर्डर करण्यासाठी पीएनआर आवश्यक आहे
रेल्वे प्रवासी आता नवीन व्हॉट्सअ‌ॅप चॅटबॉटद्वारे मेसेज करून खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकणार आहेत. जेवण ऑर्डर करण्यासाठी, प्रवाशाला त्याचा PNR वापरावा लागेल. त्याची ऑर्डर थेट सीटवर वितरीत केली जाईल. प्रवाशी रिअल टाईममध्ये त्यांच्या ऑर्डरचा मागोवा घेऊ शकतात. तसेच, कोणतीही अडचण आल्यास तुम्ही सपोर्ट टीमचीही मदत घेऊ शकता.

सध्या 100 हून अधिक स्थानकांवर सुविधा उपलब्ध
रेल्वेच्या मते, तुम्ही 7042062070 वर व्हॉट्सअ‌ॅपवर झूपशी चॅट करू शकता. सध्या ही सेवा विजयवाडा, वडोदरा, मुरादाबाद, वारंगल, दीनदयाल उपाध्याय, कानपूर, आग्रा कॅंट, टुंडला जंक्शन, बल्हारशाह जंक्शन आणि शंभरहून अधिक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर असे करा जेवन ऑर्डर करा

 • सर्वप्रथम, प्रवाशाने झूप व्हॉट्सअ‌ॅप चॅटबॉट नंबर +91 7042062070 मोबाईलमध्ये सेव्ह करावा.
 • यानंतर व्हॉट्सअ‌ॅपमध्ये Zoop चॅटबॉट उघडावा लागेल.
 • यानंतर तुम्हाला 10-अंकी पीएनआर नंबर टाइप करावा लागेल.
 • Zoop तुमचे तपशील सत्यापित करेल. त्यानंतर तुम्हाला आगामी स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.
 • त्यानंतर झूप चॅटबॉट तुम्हाला काही रेस्टॉरंट्सचा पर्याय देईल. जिथून तुम्ही जेवण ऑर्डर करू शकाल. पेमेंट मोड देखील येथे उपलब्ध असेल.
 • जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर आणि व्यवहार पूर्ण केल्यानंतर, तुम्ही चॅटबॉटवरूनच ऑर्डरचा मागोवा घेण्यास सक्षम असाल.
 • शेवटी, ट्रेन निवडलेल्या स्टेशनवर पोहोचताच झूप तुम्हाला अन्न वितरण करेल.
बातम्या आणखी आहेत...