आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्व्हेस्टमेंट टिप्स:शेअर बाजाराच्या चढ-उतारात, टाळेबंदीत गुंतवणूक धोरण कसे हवे?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भांडवल वाटप कायम राखणे दीर्घावधीत पैसा जमा करण्याची किल्ली

जगभरातील अर्थव्यवस्थांवर कोविड-१९चा खूप नकारात्मक परिणाम झाला आहे. जागतिक जीडीपी वृद्धी दरात खूप घट आली आहे, यावरून याचा अंदाज येतो. भारतातही जीडीपी दर कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, भारत सकारात्मक वृद्धी दर पाहणाऱ्या निवडक देशांमध्ये राहील.नकारात्मक अार्थिक प्रभाव नियंत्रित करण्यासाठी सरकारने २० लाख कोटी रुपयांचे मदत जाहीर केले आहे. हे देशाच्या जीडीपीच्या १०% आहे. बहुतांश उपयांचा उद्देश अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात रोकडता प्रदान करणे हा आहे आणि यासोबत भारतीय व्यवसाय आणि देशाला जास्त स्वावलंबी करणे हा आहे.

२०२० च्या सुरुवातीपासूनच देशाचा शेअर बाजार सुमारे २०% पर्यंत खाली गेला आणि इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार वेगवान पुनरागमनासाठी आतूर आहेत. अर्थव्यवस्थेत कशी सुधारणा होते यावर आणि विक्रीशी संबंधित मागणी किती वेगाने होते यावर ते अवलंबून आहे.

या दरम्यान, भारतात रिझर्व्ह बँकेसह जगभरातील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी दिलासादायक उपायांची घोषणा केली आहे. यापुढेही चढ-उतार येऊ शकतात. मात्र, योग्य योजनेद्वारे गुुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारासोबत जाणे सुलभ होऊ शकते. येथे अशाच काही टीप्स दिल्या आहेत,ज्याची माहिती प्रत्येक गुंतवणूकदारास असणे आवश्यक आहे. वेळेवर सर्वाेत्तम उपाय योजण्यासाठी आणि दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते गरजेचे आहे.

भांडवल वाटप कायम राखणे दीर्घावधीत पैसा जमा करण्याची किल्ली

भांडवल वाटप कायम राखणे हे दीर्घावधीत पैसा हाताशी ठेवण्याची िकल्ली आहे, असे सर्वात चांगल्या वित्तीय सल्लागारांकडून वारंवार सांगितले जाते. इक्विटी पोर्टफोलिओत मोठी घसरण अाहे. इक्विटी, डेट आणि खूप सोन्याच्या संतुलित पोर्टफोलिओ राखणारेच शेअर बाजारातील मंदीसमोर टिकाव धरू शकतील.

एसआयपी सुरू ठेवा

एसआयपी सुरू ठेवावी की नाही याबाबत साशंक असाल तर याबाबत निर्णय घेणे कठीण नाही. बाजारात अनिश्चितता असते तेव्हा गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेल्या पैशात जास्त युनिट्स मिळतात. परिणामी बाजार सुधारल्यावर या युनिट्सचे मूल्य वाढते. तुमचे उद्दिष्ट दीर्घकालीन असेल तर सध्याचा बाजार एमएफ युनिट्स कायम ठेवण्याच्या सरासरी गुंतवणुकीची शानदार संधी देत अाहे.

बाहेर पडण्याची रणनीती

व्यक्तीला गुंतवणूक करताना बाजाराची चाल पकडण्याच्या प्रयत्नातून दूर राहिले पािहजे. इक्विटी बाजारांतून बाहेर पडताना आपले पैसे काढण्याची योजना कायम राखणे महत्त्वाचे आहे. तुमचे उद्दिष्ट आल्याने कमीत कमी तीन पहिल्या फंड्सना इक्विटीतून डेट फंड्समध्ये शिफ्ट करत जोखिम घटवण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. अशा व्यक्तींसाठी,ज्यांचे उद्दिष्ट २०२० मध्ये पूर्ण झाले आहे, त्यांनी जोखिम कमी करण्याीचे रणनीती २०१६-१७ च्या आसपास सुरू केली पाहिजे. त्याचा परिणाम चांगला मिळेल.

वैविध्य स्वीकारले पाहिजे

गुंतवणुकीत वैविध्य स्वीकारणे यशाची किल्ली आहे. एकाच अॅसेटमध्ये पैसा गुंतवत असाल तर त्यातही गुंतवणुकीस विविधता दिली पाहिजे. शेअर बाजाराचे उदाहरण घ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात आणि शेअरमध्ये पैसा लावला पाहिजे. सध्या नवी लाट येण्याआधी लार्ज कॅप आणि मिड कॅप फंड्समध्ये पुरेशी गुुंतवणूक केली पाहिजे. देशातील जोखिमीपासून वाचण्यासाठी गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय फंड्सचाही विचार करू शकतात. सोने खरेदी गोल्ड फंड्समध्ये गुंतवणूक शक्य आहे.

आणखी घसरणीची वाट बघू नका

शेअर बाजाराचे स्तर आकर्षक वाटू शकतात, कारण काही समभागांत सध्या ५०% पर्यंत घसरण आली आहे. मात्र, बाजाराची चाल पकडण्याचा प्रयत्न करू नये. कारण, जगातील चांगले गुंतवणूकदार बाजारातील नीचांकी स्तराचा शोध घेण्यात अयशस्वी राहिले आहेत. साप्ताहिक वा मासिक एसटीपी(सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) निवडा आणि घसरणीची वाट न पाहिलेले चांगले. कारण मनासारखी अपेक्षित घसरण कधी येत नाही.

लक्षात ठेवा, भांडवलातील चांगल्या वैविध्यासह इक्विटी आणि रोख्याशिवाय सोने आणि रोकडमधील गुंतवणूक तुम्हाला अशा वातावरणातून सावरण्यात मदत करू शकते. अखेर हा तुमचा पैसा आहे आणि वेळ आल्यावर याचा चांगला उपयोग होण्यासाठी तुम्हाला चांगली देखभालही करावी लागेल.

राजीव बजाज

चेयरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बजाज कॅपिटल

बातम्या आणखी आहेत...