आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Rakesh Jhunjhunwala Increased His Investment In Another Tata Group Company, Know In Which Stock He Invested

झुनझुनवालांची वाढती गुंतवणूक:राकेश झुनझुनवालांनी टाटा ग्रुपच्या एका कंपनीत वाढवली गुंतवणूक, जाणून घ्या कोणत्या शेअरमध्ये लावले पैसे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेखा झुनझुनवालाकडे 30,75,687 शेअर्स आहेत

राकेश झुनझुनवाला, ज्यांना शेअर बाजारातील बिग बुल म्हटले जाते, त्यांनी टाटा समूहाच्या अजून एका कंपनीत गुंतवणूक वाढवली आहे. टाटा मोटर्सनंतर त्यांनी टाटा कम्युनिकेशन्समधील गुंतवणूक वाढवली आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, झुनझुनवालाचा कंपनीतील हिस्सा 1.04% वरून 1.08% पर्यंत वाढला आहे. झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

रेखा झुनझुनवालाकडे 30,75,687 शेअर्स आहेत
राकेश झुनझुनवाला यांनी टाटा कम्युनिकेशन्समध्ये त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावाने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 30,75,687 शेअर्स आहेत. जून तिमाहीत, रेखा झुनझुनवालाकडे कंपनीचे 29,50687 शेअर्स होते. अशाप्रकारे, बिग बुलने सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे 1.25 लाख नवीन शेअर्स खरेदी केले आहेत.

गुरुवारी टाटा कम्युनिकेशन्सचा शेअर 1,433 रुपयांवर बंद झाला होता. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्च स्तर 1522 रुपये आणि कमीत कमी स्तर 835 रुपये आहे.

टाटा मोटर्समधील गुंतवणुकीमुळे बंपर कमाई
राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स आणि टायटनमध्येही गुंतवणूक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात शेअर 497 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या आठवड्याच्या तेजीमध्ये तो 530 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. हा 52-आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे, तर सर्वात कमी 126 रुपये आहे. गेल्या एका आठवड्यात टाटा मोटर्सचा हिस्सा 32%, एका महिन्यात 63%, या वर्षी आतापर्यंत 170% आणि गेल्या एका वर्षात 280% वाढला आहे. झुनझुनवालांचा टाटा मोटर्समध्ये 1.1% हिस्सा आहे. त्यांच्याकडे एकूण 3.77 कोटी शेअर्स आहेत.

टायटनमध्ये 4.81% हिस्सेदारी
राकेश झुनझुनवाला यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्येही गुंतवणूक केली आहे. या आठवड्यात स्टॉक 2564 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. 2608 रुपये 52 आठवड्यांचा उच्च स्तर आहे आणि 1154 रुपये कमीत कमी स्तर आहे. या शेअरने गेल्या एका आठवड्यात 8%, एका महिन्यात 24%, या वर्षी आतापर्यंत 64% आणि गेल्या एका वर्षात 110% परतावा दिला आहे. टायटनमध्ये त्याचा 4.81% हिस्सा आहे. त्यांच्याकडे एकूण 4.26 कोटी शेअर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...